वृत्तसंस्था
रिओ दि जानेरो : ब्राझीलमधील सर्वाधिक लोकप्रिय गायिकांमधील एक नाव म्हणजे मॅरिलिया मेंडॉन्सा यांचे शुक्रवारी झालेल्या विमान अपघातात निधन झाले. त्या २६ वर्षांच्या होत्या.Popular Brazilian singer Marilia Mendonsa Died in a plane crash; Rasik sighed
मॅरिलिया मेंडॉन्सासह विमान दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला. निर्माते हेन्रिक रिबेरो, सहाय्यक अबिसिएली सिल्वेरा डायस फिल्हो तसेच पायलट आणि सहवैमानिक यांचा मृत्यू झाला आहे.
विमान कोसळण्यापूर्वी ते वीज वितरण लाईनला धडकल्याने हा अपघात झाला. मॅरिलिया मेंडॉन्साने २०१९ मध्ये लॅटिन ग्रॅमी पुरस्कारावर नाव कोरलं होतं. महिलांच्या प्रश्नांवर वाचा फोडताना, महिला संबंधित विषयांवर भाष्य करताना अनेकदा मॅरिलिया दिसून येते.
नॅशनल स्टार बनल्या
ब्राझीलमधील संगीतकार, गायका असलेल्या मॅरिलिया मेंडॉन्सा यांनी लहान वयात संगीत क्षेत्रात खूपच लांबचा पल्ला गाठला होता. देशभर प्रचंड नाव कमावले होते. गेल्या वर्षी कोरोनामुळे अनेक संगीत कार्यक्रम रद्द झाले होते. तेव्हा ऑनलाइन कार्यक्रमांतून संगीताचा प्रवास सुरू ठेवला होता.
मॅरिलियाला आहे दोन वर्षाचा मुलगा
मॅरिलिया मेंडॉन्साला दोन वर्षाचा मुलगादेखील आहे. जगातील सर्वाधिक लोकप्रिय लाइव्ह स्ट्रीममध्येदेखील तिने रेकॉर्ड केले होते. अपघातापूर्वीच मॅरिलियाने एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये कार्यक्रमाची तयारी करत होती. विमानात न्याहरी करताना दिसून आली। हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर अवघ्या चार तासांनी तिच्या टीमने मॅरिलियाच्या इन्स्टाग्रामवर तिच्या निधनाची पोस्ट शेअर केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App