अफगाणिस्तानात पाकिस्तानच्या विरोधात ठिकठिकाणी मोर्चे; दहशतवाद्यांच्या गोळीबारात महिला जखमी

विशेष प्रतिनिधी

काबूल – पंजशीरच्या युद्धात पाकिस्तानने हस्तक्षेप केल्याने अफगाणिस्तानच्या नागरिकांत पाकिस्तानच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. ठिकठिकाणी पाकिस्तानच्या विरोधात मोर्चे निघत असून काबूल येथे काढण्यात आलेला मोर्चा पांगवण्यासाठी तालिबानच्या दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार केला. त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन अनेक महिला जखमी झाल्याचे वृत्त आहे. Peoples opposes Pakistan in Afghanistan

या आंदोलनात ‘गो बॅक पाकिस्तान’ ‘स्वातंत्र्य स्वातंत्र्य हवे’ अशा घोषणा दिल्या जात आहेत. पाकिस्तानच्या दूतावासाबाहेर आंदोलन सुरू असताना त्यांना हुसकावून लावण्यासाठी तालिबानने हवेत गोळीबार केला. या आंदोलनात महिलांची संख्या लक्षणीय होती. त्यामुळे पळापळ होऊन काही महिला जखमी झाल्या.

तालिबानचे अत्याचार आणि पाकिस्तानची घुसखोरी यामुळे अफगाणिस्तानच्या नागरिकांत असंतोषाचे वातावरण आहे. वास्तविक गेल्या अनेक दिवसांपासून अफगाणिस्तानातील वेगवेगळ्या शहरात महिलांकडून आंदोलन केले जात आहे. परंतु काबूलमध्ये आंदोलन होण्याची पहिलीच वेळ आहे. काबूल येथे अध्यक्षीय भवनाजवळ सेरेना हॉटेल असून या ठिकाणी गेल्या आठवड्यात आयएसआयचे प्रमुख फैज हमीद हे थांबले होते. या हॉटेलकडे आंदोलनकर्ते जात असताना तालिबानने त्यांना हुसकावून लावले.

Peoples opposes Pakistan in Afghanistan

महत्त्वाच्या बातम्या