US Security Assistance To Pakistan : अमेरिकेकडून पाकिस्तानला देण्यात येणारा सुरक्षा सहायता निधी बंद करण्यात आला आहे. अमेरिकी संरक्षण मंत्रालय पेंटागॉनने याबाबत माहिती दिली आहे. पाकची ही मदत पूर्वीच्या ट्रम्प सरकारने निलंबित केली होती. पेंटॉगॉनने सोमवारी म्हटले की, संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी पाकचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याशी चर्चा केली. त्याच वेळी अमेरिकन एनएसए जॅक सुलिव्हान यांनी आपल्या पाकिस्तानी समकक्षांची जिनिव्हामध्ये भेट घेतली. pentagon says us security assistance to pakistan remains suspended due to involvement in terror
वृत्तसंस्था
इस्लामाबाद : अमेरिकेकडून पाकिस्तानला देण्यात येणारा सुरक्षा सहायता निधी बंद करण्यात आला आहे. अमेरिकी संरक्षण मंत्रालय पेंटागॉनने याबाबत माहिती दिली आहे. पाकची ही मदत पूर्वीच्या ट्रम्प सरकारने निलंबित केली होती. पेंटॉगॉनने सोमवारी म्हटले की, संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी पाकचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याशी चर्चा केली. त्याच वेळी अमेरिकन एनएसए जॅक सुलिव्हान यांनी आपल्या पाकिस्तानी समकक्षांची जिनिव्हामध्ये भेट घेतली.
पेंटागॉनचे प्रेस सचिव जॉन किर्बी यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना सांगितले की, “पाकिस्तानला अमेरिकेची सुरक्षा मदत अद्यापही निलंबित आहे. भविष्यात हा निर्णय बदलेल की नाही याबद्दल अंदाज बांधणार नाही.” वास्तविक किर्बी यांना प्रश्न विचारण्यात आला होता की, ट्रम्प प्रशासनाच्या पाकबद्दलच्या धोरणावर बायडेन सरकार फेरविचार करणार आहे की नाही, शिवाय याबद्दल पाक नेतृत्वासोबत बैठकीदरम्यान हा मुद्दा उपस्थित झाला होता की नाही.
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जानेवारी 2018 मध्ये पाकिस्तानला होणारी सर्व सुरक्षा मदत निलंबित केली. ट्रम्प यांनी असा युक्तिवाद केला की, दहशतवादाविरुद्धच्या लढाईत पाकिस्तानच्या सहकार्यात आणि त्यांच्या भूमिकेबाबत आम्ही समाधानी नाही. किर्बी म्हणाले की, आदल्या दिवशी ऑस्टिन यांनी जनरल बाजवा यांच्यासमवेत सामान्य प्रादेशिक विषय आणि उद्दिष्टांवर चर्चा केली. ते म्हणाले, यादरम्यान ऑस्टिन यांनी अफगाणिस्तान शांतता चर्चेसाठी पाकिस्तानच्या पाठिंब्याचे कौतुक केले. याव्यतिरिक्त अमेरिका-पाकिस्तानने द्विपक्षीय संबंध वाढवण्याची इच्छा व्यक्त केली.
लॉयड ऑस्टिन यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘मी अमेरिका-पाकिस्तान संबंधांचे कौतुक केले आणि प्रादेशिक सुरक्षा आणि स्थिरता वाढविण्यासाठी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली. जीनिव्हा येथे आमची भेट झाली. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रवक्त्या एमिली हॉर्न म्हणाल्या की, दोन्ही पक्षांनी परस्पर हितसंबंधांच्या द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक विषयांवर आणि व्यावहारिक सहकार्याच्या मार्गांवर चर्चा केली. भविष्यात हा संवाद सुरू ठेवण्यास त्यांनी सहमती दर्शविली.
pentagon says us security assistance to pakistan remains suspended due to involvement in terror
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App