वृत्तसंस्था
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान रहणार की नाही, याचा आज फैसला होणार आहे.त्यांच्याविरोधात दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर नॅशनल असेंब्लीमध्ये मतदान होणार आहे.Pakistan’s Prime Minister Imran Khan faith Will be decided today; Vote on no-confidence motion
नॅशनल असेंब्लीमध्ये त्यांच्याकडे बहुमत नाही. १७२ मते त्यांना हवी आहेत. परंतु दोन पक्षांनी त्यांची साथ सोडल्याने ते अल्पमतात आले आहेत. इम्रान खानचे स्कोअर कार्ड त्यांचा पराभव सांगणारे आहे. परंतु इम्रान खान यांची खुर्ची वाचवण्यासाठी काहीही करण्याची तयारी दिसते.
त्यासाठी समर्थकांना त्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. इम्रान यांनी स्वपक्षातील बंडखोरांच्या विरोधात हल्लाबोल करण्याचे आवाहनही केले आहे.बंडखोर सदस्यांच्या घरासमोर जमावाने एकत्र येऊन आंदोलन करण्याची सूचना त्यांनी केली.
रविवारी नॅशनल असेंब्लीत मतदान प्रक्रिया सुरू असताना देशभरातील लोकांनी लाखोंच्या संख्येने इस्लामाबादेत यावे, असे खुले आवाहन त्यांनी केले आहे. वरकरणी इम्रान यांनी समर्थकांना शांतता राखण्यास सांगितले खरे; परंतु प्रत्यक्षात परिस्थिती अशांततेकडे नेणारी आहे, असे दिसते. खुर्ची वाचवण्यासाठी इम्रान कोणत्या थराला जातील, याची चुणूक त्यांच्या भाषणातून आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App