पाकिस्तान गिलगिट-बाल्टिस्तान चीनला सोपवण्याची शक्यता, कर्जातून मुक्त होण्यासाठीचा पर्याय, भारत-अमेरिकेशी तणाव वाढणार


वृत्तसंस्था

इस्लामाबाद : चिनी कर्जाखाली दबलेला पाकिस्तान दिवसेंदिवस आर्थिक संकटाच्या दलदलीत अडकत चालला आहे. आता या कर्जातून मुक्त होण्यासाठी तो काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तानचा बेकायदेशीरपणे कब्जा केलेला भाग चीनच्या हवाली करू शकतो. असे झाले तर भारताचा तणाव गंभीर स्थितीपर्यंत पोहोचू शकतो.Pakistan to hand over Gilgit-Baltistan to China, debt relief option, escalating tensions with India

असे केल्याने पाकिस्तानला चीनचे कर्ज फेडण्यात काहीसा दिलासा मिळू शकतो. पण, अमेरिका या कारवाईवर नाराज असू शकते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून पाकिस्तानला मिळणाऱ्या मदतीवरही अडचणी येऊ शकतात.



दुसरीकडे, दक्षिण आशियामध्ये आपले वर्चस्व वाढवण्यासाठी संधी शोधत असलेल्या चीनसाठी मोठी संधी असू शकते. कारण, चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) गिलगिट-बाल्टिस्तानमधून जातो.

तज्ज्ञांच्या मते – गिलगिट-बाल्टिस्तानचा परिसर आगामी काळात संघर्षाचे नवे ठिकाण म्हणून उदयास येऊ शकतो. मात्र, चीनला हा भाग बळकावणे सोपे जाणार नाही. आंतरराष्ट्रीय निषेधासोबतच गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये राहणारे लोक याविरोधात रस्त्यावर उतरू शकतात. सीपीईसीबद्दल तेथील लोक आधीच नाराज आहेत. गिलगिट-बाल्टिस्तान प्रदेशात सरकारने आधीच स्थानिक प्रशासनाला कमी अधिकार दिले आहेत.

गिलगिट-बाल्टिस्तानमधील लोक रोजगार, वीज, शिक्षण यासारख्या अत्यावश्यक सेवांच्या अभावामुळे त्रस्त आहेत. एका अहवालानुसार – पाकिस्तानातील एकूण आत्महत्यांपैकी 9% आत्महत्या याच भागात होतात.

दुसरीकडे, गेल्या वर्षी अफगाणिस्तानमधून बाहेर पडल्यानंतर, अमेरिका चीनला गिलगिट-बाल्टिस्तानवर कब्जा करू देण्याच्या स्थितीत नाही. अमेरिकन नेते बॉब लॅन्सिया यांच्या मते – जर गिलगिट-बाल्टिस्तानचा भाग भारतात असता किंवा स्वतंत्र देश असता तर अमेरिका चीनला चोख प्रत्युत्तर देऊ शकली असती. अफगाणिस्तानला शस्त्रे पोहोचवण्यासाठी अमेरिकन सैन्य पाकिस्तानवर अवलंबून नाही.

Pakistan to hand over Gilgit-Baltistan to China, debt relief option, escalating tensions with India

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात