विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद – अफगाणिस्तानच्या प्रश्ना वर चर्चा करण्यासाठी पाकिस्तानने शेजारी देशांच्या राजदूतांची बैठक बोलाविली होती. या व्हर्च्युअल बैठकीला चीन, इराण, ताजिकीस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकीस्तानचे राजदूत आणि विशेष प्रतिनिधी उपलब्ध होते. Pakistan takes meeting on Afghan issue
अमेरिकेचे लष्कर अफगाणिस्तानमधून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तानने या देशात जोरदार लुडबूड सुरु केली आहे. अफगाणिस्तानचे तारणहार जणू आपणच असल्याच्या अविर्भावात पाकिस्तान वावरत असून त्याचे पडसाद जागतिक राजकारणात उमटण्यास सुरुवात झाली आहे. शेजारी देशांची बैठका हा त्याचाच एक भाग होता.
पाकिस्तानचे अफगाणिस्तानमधील विशेष राजदूत महंमद सादीक हे या बैठकीचे अध्यक्ष होते. या बैठकीमध्ये अफगाणिस्तानमधील परिस्थितीबाबत सर्वांनी चर्चा करत आपली भूमिका मांडली. अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करून नव्या संधी निर्माण करण्यासाठी सर्व देश एकत्र येत असल्याबद्दल पाकिस्तानने समाधान व्यक्त केले. अफगाणिस्तानचा विकास झाल्यास आशियातील व्यापार आणि अर्थव्यवस्थेला बळ मिळणार आहे, असे सादीक यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App