पाक पंतप्रधानांचा खळबळजनक दावा! अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्याबद्दल काय बोलले इम्रान खान?


विशेष प्रतिनिधी

पाकिस्तान : शुक्रवारी संयुक्त राष्ट्र महासभेच्या आपल्या भाषणादरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एक खळबळजनक दावा केला होता. त्यांच्या दाव्यानुसार, अमेरिकेचे माजी अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी अफगान मुजाहिद्दीनची तुलना अमेरिकेच्या संस्थापकांशी केली होती.

Pakistan PM Imran Khan wrongly claims ex US president Ronald Reagan compared Mujahideens to America’s founding fathers

आपल्या भाषणामध्ये त्यांनी अनावधानाने हे देखील सांगितले होते की, पाकिस्तान आणि अमेरिकेनेच अफगाणिस्तानातील मुजाहिद्दीन गटांना लष्करी प्रशिक्षण दिले होते. अफगाणिस्तान मधील मुजाहिद्दीन गटांमध्ये अलकायदा, मुजाहिद्दीन अफगाण, मुजाहिद्दीन असे जगातील विविध गट होते. अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी अफगाण मुजाहिद्दीना १९८३ मध्ये व्हाइट हाऊसमध्ये आमंत्रित  केले होते. असा दावा इम्रान खान यांनी केला आहे.


तालिबान इम्रान खानला म्हणाला कठपुतळी , अफगाणिस्तान प्रकरणापासून दूर राहण्याचा दिला सल्ला


पाकिस्तानी पंतप्रधान एका आंतरराष्ट्रीय मंचावर असे खोटे आणि अपमानजनक दावे कसे करू शकतात? असा प्रश्न पाकिस्तानी पत्रकार घरीद फारुकी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन विचारला आहे. त्याचप्रमाणे मानवाधिकार कार्यकर्ते सलीम जावेद यांनी २ मार्च १९८५ साली रेकॉर्ड केलेली मूळ व्हिडिओ क्लीप आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे.

यामध्ये रोनाल्ड रेगन यांनी कॉन्झर्व्हेटिव्ह पॉलिटिकल अक्शन कॉन्फरन्सच्या वार्षिक परिषदेदरम्यान एक वक्तव्य केलेले दिसून येते. पण हे वक्तव्य त्यांनी अफगाण मुजाहिद्दीन बद्दल केले नसून, या व्हिडिओ क्लिपमधून हे साफ स्पष्ट होते की अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष यांनी निकारायुगा सरकार उलथवून टाकण्याचे हे विधान केले होते. निकारागुआ  सरकार पाडण्यासाठी त्यांनी बंडखोरांना 14 दशलक्ष डॉलर्स इतकी मदत जाहीर केली होती आणि त्यांना अमेरिकेच्या संस्थापकांशी कम्पेअर केले होते. अफगाणिस्तानातील मुजाहिद्दीन गटांसोबत तुलना करणे शक्य नाही, असे मानवाधिकार कार्यकर्ते सलीम जावेद यांचे म्हणणे आहे. या सर्व गोष्टींवर मीडियामध्ये बरीच मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Pakistan PM Imran Khan wrongly claims ex US president Ronald Reagan compared Mujahideens to America’s founding fathers

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात