Pakistan Economy News: रमजानमध्ये पाकिस्तानात महागाईमुळे सर्वत्र हाहाकार; केळी ५०० रुपये डझन, तर द्राक्षे तब्बल १६०० रुपये किलो

पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून खूप आशा होत्या, पण…

विशेष प्रतिनिधी

इस्लामाबाद : भीषण आर्थिक संकटात अडकलेल्या पाकिस्तानसाठी यावेळी रमजान महिना खूपच कठीण झाला आहे. देशातील दैनंदिन वस्तूंशिवाय पीठही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. तसेच समोर येणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवला तर केळी, द्राक्षे ही फळे आता स्वप्नासारखी झाली आहेत. सध्या देशात केळी आणि द्राक्षे किती भावाने विकली जात आहेत हे जाणून तुम्हाला धक्का बसेल. पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून खूप आशा होत्या, पण त्यांना पाकिस्तान ऐवजी श्रीलंकेला मदत करणे चांगले वाटले. त्यामुळे आता भविष्यात पाकिस्तानचे काय होणार? हे कोणालाच माहीत नाही. Pakistan Economy News Inflation wreaks havoc in Pakistan during Ramazan 500 rupees per dozen of bananas and Rs 1600 per kg of grapes


पाकिस्तानात महागाईने मोडले सर्व विक्रम, महागाई दर 46.65 टक्क्यांवर, 26 वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ


सध्या पाकिस्तानमध्ये डझनभर केळीचा भाव तब्बल ५०० रुपयांवर पोहोचला आहे. याशिवाय द्राक्षे १६०० रुपये किलोने विकली जात आहेत. कांद्याचे भाव २२८.२८ टक्क्यांनी वाढले आहेत. तर पिठाच्या किमतीत १२०.६६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याआधी देशात ५१ वस्तूंच्या किंमतींचा मागोवा घेतला गेला आहे आणि प्रत्येक गोष्ट अनेक वेळा महाग झाली आहे. केळीच्या दरात ८९.८४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशात सध्या डिझेल १०२.८४ टक्के आणि पेट्रोल ८१.१७ टक्क्यांनी महागले आहे. जर आपण अंड्यांबद्दल बोललो तर त्याची किंमत सुमारे ८० टक्क्यांनी वाढली आहे. पाकिस्तानचे आर्थिक संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे.

कर्जासाठी वाटाघाटी सुरू –

पाकिस्तान आणि IMF या दोघांमध्ये मध्ये १.१ अब्ज डॉलर्स कर्जाच्या करारासाठी वाटाघाटी सुरू आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी श्रीमंत आणि प्रभावशाली ग्राहकांकडून इंधनासाठी जास्त शुल्क देण्याची घोषणा केली होती. यातून जी काही रक्कम मिळेल, ती गरिबांना सबसिडी देण्यासाठी वापरली जाईल, असे ते म्हणाले होते. पाकिस्तानचे पेट्रोलियम मंत्री मुस्सादिक मलिक म्हणाले की, त्यांच्या सरकारला इंधनाच्या किंमतीच्या योजनेवर काम करण्यासाठी सहा आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे.

Pakistan Economy News Inflation wreaks havoc in Pakistan during Ramazan 500 rupees per dozen of bananas and Rs 1600 per kg of grapes

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात