विशेष प्रतिनिधी
लंडन – ओमिक्रॉनचा सर्वाधिक फटका युरोपला बसत आहे. गेल्या सात दिवसात युरोपमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले असून मृतांची संख्या देखील अधिक आहे.Omricon increasing in Europe
जर्मनीत सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे या निर्बंधाच्या विरोधात नागरिक रस्त्यावर उतरले होते. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. यात काही जण जखमी झाले. जर्मनीत सार्वजनिक ठिकाणी, सिनेमा, स्वीमिंग पूल, नाइट क्लब, रेस्टॉरंट, हॉटेल, म्युझियम येथील संख्येवर निर्बंध आणले आहेत. लस न घेतलेल्यानागरिकांना परवानगी दिली जाणार नाही.
तसेच लस घेतलेल्या लोकांना नवीन नियमांचे पालन करावे लागेल.अमेरिकेत अध्यक्ष ज्यो बायडेन प्रशासनाने लसीकरणावर भर दिला असून बूस्टर डोस आणि तातडीने तपासणी करण्यावर प्राधान्य दिले जात आहे. न्यूयॉर्क शहरात जवळपास सर्वच दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लसीकरण अनिवार्य केले आहे.
कालपासून हा नियम लागू केला आहे. साथरोग नियंत्रण विभागाचे तज्ञ डॉक्टर ॲथनी फॉसी यांनी म्हटले की, अमेरिकेने घरगुती उड्डाणाच्या प्रवाशांना देखील लसीकरणाचे बंधन घालायला हवे अन्यथा स्थिती चांगली होण्याऐवजी ढासळेल. लसीचे बंधन घातल्यास लोकांना लस घेण्यास अधिक प्रोत्साहन मिळते, असेही त्यांनी नमूद केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App