मंत्रालय़ाकडून जारी करण्यात आलेल्या दहा निर्देशांचे रमजान काळात करावे लागणार पालन
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मुस्लीम बांधवांसाठी पवित्र असणारा रमजान महिना २२ मार्चपासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. या महिन्यात मुस्लीम बांधव उपवास करतात, सामूहिक नमाज पठण केले जाते. दरम्यान रमजान सुरू होण्या अगोदर सौदी अरेबियाने अनेक नियम आणि निर्बंधांसह एक फरमान काढले आहे. यामध्ये मशिदीवरील भोंग्यांच्या आवाजावर मर्यादा घालणे, देणग्यांवर अंकुश ठेवणे आणि मशिदींमधील नमाजाच्या प्रसारणावर बंदी घालणे यांचा समावेश आहे. No prayer broadcast loudspeakers Saudi Arabia imposes restrictions on Ramzan celebrations
शुक्रवारी जारी करण्यात आलेल्य एका नोटीसमध्ये इस्लामिक व्यवहार, दावाह आणि मार्गदर्शन मंत्री शेख अब्दुल लतीफ बिन अब्दुल अझीज अल-अलशेख यांनी दहा निर्देशांसह एक पत्रक जारी केले, ज्या निर्देशांचे नागरिकांना रमजानच्या महिन्यात पालन करावे लागणार आहे. उपरोक्त मार्गदर्शक तत्त्वांमध्ये मशिदींमध्ये नमाज पठण करणाऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्थेसाठी दान जमा करण्यापासून रोखणे, रोजचे जेवण मशिदीच्या आतमध्ये न तयार करता मशिदीच्या पटांगणात ठरवण्यात आलेल्या ठिकाणी तयार करण्यास सांगण्यात आले आहे. शिवाय हे भोजनही इमाम आणि मुएझिन यांच्या देखरेखीतच व्हायला हवे.असेही म्हटले गले आहे.
राहुल गांधींचे संसद सदस्यत्व जाणार का? भाजपा खासदाराने केली आहे मागणी!
मशिदीमध्ये फोटोग्राफी आणि नमाजच्यावेळी लहान मुलांना बंदी –
याशिवाय मंत्रालयाच्या निर्देशात असेही अनिवार्य करण्यात आले आहे की, हे दोन व्यक्ती अतिआवश्यक कामाशिवाय संपूर्ण महिनाभर उपस्थित राहतील. त्यांना हे सुनिश्चित करावे लागेल की, सायंकाळची नमाज-तराबी आणि रात्रीची नमाज-तहज्जुद पुरेशा वेळेत पूर्ण होईल, जेणेकरून गैरसोय होणार नाही. रमजानच्या शेवटच्या दहा दिवसांमध्ये मशिदीत एतिकाफ आणि एकांत असावा. फोटोग्राफी आणि मशिदींमध्ये नमाज आणि कार्यक्रम प्रसारित करण्यासाठी कॅमेरा वापरण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय मंत्रालयाने मुलांना मशिदीत आणण्यासही मनाई केली कारण यामुळे नमाज पठणात व्यत्यय येऊ शकतो. तसेच मागील वर्षांपासून जारी केलेल्या नियमानुसार नमाजाच्या वेळी लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्यासही सांगितले आहे. याशिवाय मंत्रालयाच्या सूचना मशिदीबद्दल उपयुक्त पुस्तके वाचण्यासही प्रोत्साहित करत आहेत.
أصدر معالي وزير الشؤون الإسلامية د.#عبداللطيف_آل_الشيخ تعميمًا لكافة فروع الوزارة بضرورة تهيئة المساجد والجوامع لمايخدم المصلين، وذلك ضمن استعدادات الوزارة لاستقبال شهر #رمضان المبارك لهذا العام ١٤٤٤هـ. pic.twitter.com/9Q4x9CWWPE — وزارة الشؤون الإسلامية 🇸🇦 (@Saudi_Moia) March 3, 2023
أصدر معالي وزير الشؤون الإسلامية د.#عبداللطيف_آل_الشيخ تعميمًا لكافة فروع الوزارة بضرورة تهيئة المساجد والجوامع لمايخدم المصلين، وذلك ضمن استعدادات الوزارة لاستقبال شهر #رمضان المبارك لهذا العام ١٤٤٤هـ. pic.twitter.com/9Q4x9CWWPE
— وزارة الشؤون الإسلامية 🇸🇦 (@Saudi_Moia) March 3, 2023
तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरूवात –
दुसऱ्या बाजूस या निर्बंधांवर जगभरातील मुस्लिमांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक समीक्षकांनी या मार्गदर्शक तत्त्वांना लोकांच्या जीवनात इस्लामचा प्रभाव मर्यादित करण्याचा सौदी सरकारचा प्रयत्न म्हणून पाहिले आहे.
मंत्रालयाने स्पष्ट केली भूमिका –
सौदी वृत्तवाहिनी अल-सौदियाला दिलेल्या टेलिफोनिक मुलाखतीत मंत्रालयाच्या प्रवक्त्याने चिंता व्यक्त केली, ते म्हणाले, “मंत्रालय मशिदींमध्ये रोजा सोडण्यास प्रतिबंधित करत नाही, उलट त्याची व्यवस्था करत आहे. जेणेकरून मशिदीत जबाबदार व्यक्ती उपस्थित राहतील आणि मशिदीचे पावित्र्य आणि स्वच्छता राखले जाईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App