पीएचडी, मास्टर डिग्रीला सुद्धा काही अर्थ नाही; अफगाणच्या नूतन शिक्षणमंत्र्यांने उधळली मुक्ताफळे


वृत्तसंस्था

काबुल : आम्हा तालिबानीकडे कोणाकडेही कसलीही डिग्री नाही, तरी आम्ही महान आहोत. यामुळे आजच्या काळात कोणत्याही प्रकारच्या पीएचडी किंवा मास्टर डिग्रीची आवश्यकता नाही, या डिग्रीना काही अर्थ नाही, अशी मुक्ताफळे अफगाणिस्तानचे नूतन शिक्षणमंत्री शेख मौलवी नूरल्लाह मुनीर यांनी उधळली आहेत. No PHD, Masters degree needed in Afghanistan: Taliban Education minister

अफगाणिस्तानात तालिबानी सरकार आल्यापासून मध्ययुगीन कालखंडात देश गेला आहे. तालिबानी या रानटी टोळ्यांची राजवट अफगाणिस्तानात आल्यानंतर नागरिकांवर इस्लामी शरियत कायदा सक्तीने लावण्यास सुरवात केली आहे. प्रथम मुला- मुलींनी एकत्र शिक्षण घेऊ नये. कायम पडदानशीन रहावे, आधुनिक पेहराव केल्यास कडक शिक्षा, असे प्रकार सुरू झाले आहेत. महिलांनी घरातच काम करावे, असे फतवे काढले आहेत.



दहशतवादी बनले राष्ट्राध्यक्ष आणि मंत्रीसूद्धा

तालिबानने सरकार स्थापनेची घोषणा करताना आंतरराष्ट्रीय दहशतवादी मुल्ला मुहम्मद हसन अखुंदला अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष घोषित केले. तर मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हक्कानीला गृहमंत्री. यावर कडी म्हणून की काय शिक्षणमंत्र्याने आता मूळ उद्देशालाच सुरुंग लावण्याचे काम केले आहे.

शिक्षण मंत्र्यांनी तर कमालच केली आहे. आजच्या काळात पीएचडी किंवा अन्य कोणतीही मास्टर डिग्री काही कामाची नाही, असे खळबळजनक वक्तव्य केले आहे.

No PHD, Masters degree needed in Afghanistan: Taliban Education minister

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात