तंबाखू सेवन कायमस्वरुपी बंद करण्यासाठी न्यूझीलंड सरकारची अभिनव योजना


विशेष प्रतिनिधी

वेलिंग्टन – नागरिकांमधील तंबाखू सेवन कायमस्वरुपी बंद करण्यासाठी न्यूझीलंड सरकारने एक अभिनव योजना तयार केली आहे. न्यूझीलंड सरकारने या कायद्याचा मसुदा जाहीर केला आहे. या प्रस्तावित कायद्यानुसार, सिगारेट खरेदी करण्याच्या किमान वयात दरवर्षी वाढ केली जाणार आहे.New Zeland unvill new scheme for tobacco free nation

म्हणजेच, कायदा अस्तित्वात आल्यानंतर ६५ वर्षांनी केवळ ८० वर्षांच्या पुढील व्यक्तींना सिगारेट खरेदी करता येऊ शकेल.ही योजना अमलात आल्यास सध्या १४ किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या असलेल्या मुला-मुलींना त्यांच्या पुढील आयुष्यात कधीही सिगारेट अथवा इतर तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करता येणार नाही.



वास्तवात, सिगारेट ओढण्याची नागरिकांची सवय त्याआधीच अनेक वर्षे बंद होईल, असा सरकारला विश्वालस आहे. हा कायदा पुढील वर्षी मंजूर होण्याची शक्यता आहे. २०२५ पर्यंत देशात सिगारेटचे व्यसन असलेले पाच टक्क्यांहून कमीच लोक असतील,

असे लक्ष्यही सरकारने समोर ठेवले आहे. याशिवाय, तंबाखूमधील निकोटीनचे प्रमाण कमी करणे आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानांची संख्या कमी करणे, असे उपायही मसुद्यात सुचविण्यात आले आहेत.

तंबाखूमुळे आरोग्याचे नुकसान झालेले अनेक जण भेटतात. अनेक लोकांचा यामध्ये भयावह पद्धतीने अंतही होतो. गेल्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांमुळे न्यूझीलंडमध्ये फक्त ११ टक्के प्रौढ नागरिक धुम्रपान करतात.

New Zeland unvill new scheme for tobacco free nation

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात