‘बेन्नू’ या लघुग्रहावरून माती आणि खड्याचे नमुने गोळा करून नासाचे ओसिरीस-रेक्स’ निघाले पृथ्वीकडे


विशेष प्रतिनिधी

केप कॅनव्हेराल : ‘बेन्नू’ या लघुग्रहावरून माती आणि खड्याचे नमुने गोळा केलेल्या ‘नासा’च्या अवकाशयानाने पृथ्वीच्या दिशेने परतीचा प्रवास सुरु केला आहे. हे ‘ओसिरीस-रेक्स’ यान पृथ्वीवर पोहोचण्यास दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे.Nasas Osiris reks coming back to earth

२०१६ मध्ये पृथ्वीवरून उड्डाण केल्यानंतर ‘ओरिसीस-रेक्स’ हे यान बेन्नू लघुग्रहाजवळ २०१८ मध्ये पोहोचले होते. दोन वर्ष लघुग्रहाभोवती भ्रमण केल्यानंतर या यानाने मातीचे आणि खड्यांचे नमुने गोळा केले होते.



साधारण ४०० ग्रॅम वजनाचे हे नमुने आहेत. अमेरिकेने चंद्रावरून नमुने आणले होते, त्यानंतर अवकाशातून आणले गेलेले हे सर्वाधिक वजनाचे नमुने असतील.

या नमुन्यांचा अभ्यास करून सौरमालेबाबत अधिक माहिती समजू शकेल, अशी संधोधकांना आशा आहे. हे यान २४ सप्टेंबर २०२३ या दिवशी एका कुपीद्वारे लघुग्रहावरील मातीचे नमुने उटाह येथील वाळवंटात टाकण्याचे नियोजन आहे.

त्यापूर्वी ते सूर्याभोवती दोन प्रदक्षिणा मारणार आहे. या मोहिमेसाठी एकूण ८० कोटी डॉलर खर्च आला आहे.

Nasas Osiris reks coming back to earth

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण