मलाला यूसुफजईने आसिरशी बांधली बर्मिंगहॅम मध्ये रेशीमगाठ!!

वृत्तसंस्था

बर्मिंगहॅम : स्त्री शिक्षणाची आघाडीची पुरस्कर्ती आणि नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसूफझाई है हिने बर्मिंगहॅम मध्ये रेशीमगाठ बांधली आहे. बर्मिंगहॅम मधल्या घरातच तिचा निकाह समारंभ झाला आणि तिने आसिरशी रेशीमगाठ बांधतात नाते जोडले. Malala Yousafzai engaged Asir Birmingham !!

ही माहिती तिने स्वतः ट्विट करून दिली आहे. जीवनाच्या नव्या अंकामध्ये मी प्रवेश करत आहे. मला भरभरून आशीर्वाद द्या, अशी अपेक्षा तिने या ट्विटमधून व्यक्त केली आहे. यांनी निकाह समारंभाला मोजकेच लोक उपस्थित होते. मलालाच्या वडिलांनीही ट्विट करून दोघांना आशीर्वाद दिले आहेत.

मलाला युसुफजाई ही स्त्री शिक्षणाची आघाडीची पुरस्कर्ती आहे. 2012 मध्ये तिच्यावर तालिबान्यांनी पाकिस्तान मधल्या मिंगोरा येथे हल्ला केला होता. तिच्या डोक्यात गोळ्या घातल्या होत्या. परंतु सुदैवाने ती वाचली. त्यानंतर देखील तिने आपला शिक्षणाचा आग्रह सोडला नाही. परंतु कुटुंबाला पाकिस्तान सोडावे लागले. त्यावेळी ती बारा वर्षांची होती. वयाच्या पंधराव्या वर्षी संयुक्त राष्ट्र संघात स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणारे भाषण केले होते.

त्यानंतर तिला नोबेल पारितोषिकाने गौरविण्यात आले. हे पारितोषिक तिला कैलास सत्यार्थी यांच्यासमवेत विभागून देण्यात आले. मलाला आता 24 वर्षांची आहे आणि तिने आसिरशी रेशीमगाठ बांधून नव्या जीवनात प्रवेश केला आहे.

Malala Yousafzai engaged Asir Birmingham !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात