कमला हॅरिस यांच्याकडे राष्ट्रपतीपदाची धुरा; काही काळ काळजीवाहू म्हणून काम करणार


वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस या काही काळासाठी अमेरिकेच्या राष्ट्रपती बनणार आहेत. राष्ट्रपती जो बायडेन यांच्यावर उपचार करण्यात येणार असल्याने हॅरिस या काळजीवाहू राष्ट्रपती बनणार आहेत. Kamala Harris holds the presidency; Will work as a caretaker for some time

राष्ट्रपती जो बायडेन यांना पोटाची व्याधी निर्माण झाली आहे. त्यासाठी कोलोनोस्कोपी केली जाणार आहे. त्यासाठी त्यांना भूल दिली जाणार आहे. हे उपचार ८५ मिनिटे चालणार आहेत. त्यामुळे हॅरिस यांच्याकडे राष्ट्रपती पदाची धुरा या कालावधीत दिली जाणार आहे. त्यामुळे अमेरिकेच्या २५० वर्षांच्या इतिहासात प्रथमच एक महिला कमला हॅरिस यांच्या रूपाने राष्ट्रपती बनणार आहे.


जो बिडेन, कमला हॅरिस आणि बोरिस जॉन्सन यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या


मूळच्या भारतीय वशांच्या कमला हॅरिस या आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या सर्वोच्च पदी म्हणजेच पहिल्या काळजीवाहू महिला राष्ट्रपती बनण्याचा मान भारताला अपरोक्षपणे मिळत आहे.
सर्वसाधरणपणे अमेरिकेचा उपराष्ट्रपती हा भावी राष्ट्रपती म्हणून ओळखला जातो. जो बायडेन यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राष्ट्रपतीपदी भूषविण्याची संधी कमला हॅरिस यांनाच मिळण्याची दाट शक्यता आहे. तूर्त तरी त्या काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून कार्य करणार आहेत.

Kamala Harris holds the presidency; Will work as a caretaker for some time

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी