विशेष प्रतिनिधी
तेहरान : युक्रेन अमेरिकेने निर्माण केलेल्या संकटाचा बळी आहे. संघर्षाच्या मुळांकडेही पाहिले पाहिजे. अमेरिकेवर विश्वास ठेवता येत नाही हे युक्रेनमधील संकटाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. अमेरिकेची माफिया राजवट जगभरात संकटे निर्माण करत आहे, अस आरोप इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी केला आहे.Iran’s Supreme Leader Ayatollah Khomeini accuses US mafia regime of creating global crisis
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पुन्हा एकदा इराणकडून अमेरिकेला लक्ष्य करण्यात आले आहे. अली खामेनी म्हणाले की, या संकटाचे मूळ कारण ओळखले पाहिजे आणि पाश्चात्य शक्तींना देखील पहावे लागेल. अमेरिकेची माफिया राजवट जगभरात संकटे निर्माण करत आहे.
युक्रेन देखील अशा धोरणांचा बळी ठरला आहे आणि या परिस्थितीत उभे रहावे लागत आहे.युक्रेन युद्धावरील आपल्या तासभराच्या भाषणात खामेनी यांनी पुन्हा एकदा रशियाचा उल्लेख केला नाही. खामेनी म्हणाले की,
जगभरातील सरकारे आणि लोकांनी युक्रेनच्या संकटातून शिकले पाहिजे की पश्चिमात्यांवर विश्वास ठेवता येणार नाही. जनता हे सरकारचे सर्वात महत्वाचे समर्थक आहेत आणि जर युक्रेनच्या जनतेने त्यांच्या सरकारला पूर्ण पाठिंबा दिला असता तर आज ते जिथे आहेत तिथे नसते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App