विशेष प्रतिनिधी
सॅनफ्रान्सिस्को – जगप्रसिद्ध ‘ॲपल’ कंपनी पुढील महिन्यामध्ये ‘आयफोन-१३’ लाँच करण्याची शक्यता आहे. या आयफोनला थेट सॅटेलाइट कम्युनिकेशन कनेक्टिव्हीटी असेल त्यामुळे युजरना मोबाईल नेटवर्क नसले तरीसुद्धा संदेश पाठविता येतील तसेच कॉल करणेही शक्य होणार आहे.IPhone will connect with satellite directly
पृथ्वीच्या खालच्या कक्षेत असणाऱ्या या उपग्रहाशी हा स्मार्टफोन कनेक्टेड असेल. या फोनमध्ये थेट उपग्रहांशी कनेक्ट होण्याची क्षमता असल्याने त्याला फोर-जी अथवा फाईव्ह-जी तंत्रज्ञानावर अवलंबून राहावे लागणार नाही. ‘क्वालकॉम एक्स६० बेसबँड चीप’मुळे युजरना हा आयफोन वापरणे अधिक सुलभ होईल.
कारण तो थेट उपग्रहाच्या संपर्कात राहील. दरम्यान नव्या फोनला ‘आयफोन-१३’ असे नाव देण्याऐवजी ते ‘आयफोन-२०२१’ असे असू शकते. याआधी अनेक युजरनी देखील ऑनलाइन सर्वेक्षणामध्ये देखील हीच मागणी केली होती.
अनेकदा डोंगराळ आणि दुर्गम भागांमध्ये गेल्यानंतर रेंजची समस्या येते. पण नव्या आयफोनमुळे ती देखील सुटणार आहे. स्मार्ट स्पीकरसारखे नवे डिव्हाईस देखील बाजारात आणण्याचा ॲपलचा विचार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App