वृत्तसंस्था
सिडनी : ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथील भारतीय वाणिज्य दूतावासावर हल्ला झाला आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, 21 फेब्रुवारीच्या रात्री वाणिज्य दूतावासावर हल्ला झाला. 22 फेब्रुवारीला सकाळी ही माहिती मिळाली. भारताच्या राजदूत अर्चना सिंह यांनी क्वीन्सलँड पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे.Indian Embassy Attack Targeted by Khalistanis in Brisbane, Australia; Attacks on two temples on Mahashivratri
पोलिसांनी खलिस्तानी ध्वज जप्त केला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे. याआधी महाशिवरात्रीला दोन हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्यात आले होते. भारत सरकारने याबाबत ऑस्ट्रेलियाशी चर्चा केली आहे. याआधी हिंदू मंदिरांवर भारतविरोधी आणि खलिस्तान समर्थक घोषणा लिहिण्यात आल्या होत्या.
रिपोर्टनुसार, ब्रिस्बेनचे हे वाणिज्य दूतावास स्वान रोडवर आहे. हा भाग ब्रिस्बेनचा एक उपनगरीय भाग आहे. 21 फेब्रुवारीच्या रात्री काही खलिस्तान समर्थकांनी वाणिज्य दूतावासावर हल्ला केला आणि येथे खलिस्तानचा झेंडा फेकला.
22 फेब्रुवारीला सकाळी काउन्सिलर अर्चना सिंह येथे पोहोचल्या तेव्हा त्यांना झेंडा दिसला. अर्चनाने तत्काळ क्वीन्सलँड पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी येऊन ध्वज ताब्यात घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाणिज्य दूतावासाला कोणताही धोका नाही.
भारतीयांना धोका वाढला!
अहवालात असे म्हटले आहे की, आतापर्यंत खलिस्तानी भारतीयांवर हल्ले करायचे किंवा त्यांच्या मंदिरांना लक्ष्य करायचे. भारत सरकारच्या कार्यालयाला थेट लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे. ऑस्ट्रेलियन टुडे या वृत्तपत्रानेही पोलिसांच्या हवाल्याने या हल्ल्याला दुजोरा दिला आहे.
अर्चना सिंह म्हणाल्या- आमचा पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. आता वाणिज्य दूतावासाच्या संपूर्ण भागावर पाळत ठेवण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियातील सर्व भारतीय सुरक्षेच्या मुद्द्यावर एकत्र काम करत आहेत. मेलबर्नमध्ये भारतीयांवर हल्ल्याची घटना घडली होती, आता अशी कोणतीही घटना घडू दिली जाणार नाही.
ऑस्ट्रेलियन मीडियाचे म्हणणे आहे की, परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि त्यांचे डेप्युटी व्ही. मुरलीधरन यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून खलिस्तानी समर्थक अधिकच संतापले आहेत. खलिस्तानी समर्थक आता भारतीयांना फोनवरून धमकावत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App