विशेष प्रतिनिधी
बीजिंग – भारत आणि चीनमध्ये द्वीपक्षीय संबंध दृढ करण्याच्या अनेक संधी होत्या, मात्र निर्माण झालेल्या ‘काही आव्हानां’मुळे या संधी दवडल्या गेल्या, असे स्पष्ट मत चीनमधील भारताचे मावळते राजदूत विक्रम मिस्री यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांच्याबरोबर बोलताना व्यक्त केले.India targets China regarding two nations relations
विक्रम मिस्री यांची भारतात बदली झाली असून मायदेशी परतण्यापूर्वी त्यांनी औपचारिकता म्हणून वँग यी यांची व्हर्च्युअल भेट घेतली. पूर्व लडाखमधील सैन्य तैनातीवरून निर्माण झालेल्या तणावाचा अप्रत्यक्ष संदर्भ देताना मिस्री म्हणाले की,‘‘भारत आणि चीन यांच्यातील संबंधात अनेक संधी आणि आव्हाने आहेत. गेल्या वर्षभरात काही आव्हानांमुळे अनेक संधी दवडल्या गेल्या.
India China dispute:अरुणाचल प्रदेशचा भाग चीननं बळकावल्याचा अमेरिकेचा रिपोर्ट ; भारताने फेटाळला दावा
मात्र, राजकीय, राजनैतिक आणि लष्करी पातळीवर संपर्क कायम ठेवत दोन्ही देश एकमेकांमधील वादाच्या मुद्यांवर तोडगा काढतील, असा मला विश्वामस आहे.’’ मिस्री हे लवकरच नवी दिल्लीला परतत असून त्यांच्या जागी अद्याप नवीन नियुक्ती झालेली नाही.
वँग यी यांनीही संबंध सुधारण्याची आशा व्यक्त केली. भारत आणि चीन यांनी एकमेकांबद्दल गैरसमज निर्माण करून न घेता आणि एखाद्या घटनेवरून मोजमाप न करता दीर्घकालिन दृष्टीकोन ठेवत संबंध दृढ करायला हवेत, असे मत वँग यी यांनी व्यक्त केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App