भारताने लसीची निर्यात बंद केल्याने ९१ देशांत कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धोका, जागतिक आरोग्य संघटनेची भीती


भारतीय लसींची निर्यात बंद केल्यामुळे जगभरातील ९१ देशांवर कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हे गरीब देश कोविशिल्ड या लसीवर अवलंबून होते. याची भारतात निर्मिती अदर पूनावाला यांची सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करत आहे. तसंच कोरोना प्रतिबंधात्मक नोवावॅरक्सच्याही हे देश प्रतीक्षेत असल्याचे भीती जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितले.India suspends vaccine exports, threatens new corona strain in 91 countries, WHO fears


विशेष प्रतिनिधी

जिनीव्हा : भारतीय लसींची निर्यात बंद केल्यामुळे जगभरातील ९१ देशांवर कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हे गरीब देश कोविशिल्ड या लसीवर अवलंबून होते.

याची भारतात निर्मिती अदर पूनावाला यांची सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करत आहे. तसंच कोरोना प्रतिबंधात्मक नोवावॅरक्सच्याही हे देश प्रतीक्षेत असल्याचे भीती जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितले.डॉ. सौम्यनाथन म्हणाल्या, भारतात सर्वप्रथम कोरोनाचा इ.1.617.2 व्हेरिअंट सापडला होता. करोना प्रतिबंधात्मक लसींचा पुरवठा होत नसल्यानं आफ्रिकी देशांवर या व्हेरिअंटचा धोका वाढला आहे.

अन्य गरीब देशांनाही लसीचा पुरवठा न होण्याची शक्यता आहे. या देशांमध्ये इ.1.617.2 व्हेरिअंट तेजीने पसरत आहे. याची ओळख पटण्यापूर्वीच हा विषाणू तेजीनं पसरतो. विषाणूच्या ११७ व्हेरिअंटमध्ये असे दिसून आले आहे.जर लसींचा असाच असमान पुरवठा सुरू राहिला तर काही देशांमध्ये याचा मोठा फटका बसू शकेल.

येणाºया लाटा गरीब देशांसमोर मोठं संकट निर्माण करू शकतात. परंतु भारताला कोणीही सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेककडून मोठ्या प्रमाणात लस खरेदीसाठी कोणीही थाबवू शकत नाही, असेही डॉ. सौम्यनाथन यांनी स्पष्ट केले.

India suspends vaccine exports, threatens new corona strain in 91 countries, WHO fears

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण