वृत्तसंस्था
वॉरसा : दुसऱ्या महायुद्धातील महाकाय बॉम्ब निष्क्रिय करण्याचे प्रयत्न सुरु असताना त्याचा भीषण स्फोट झाल्याची घटना पोलंडमध्ये घडली आहे. एका कालव्यात हा 5.4 टन वजनाचा बॉम्ब कित्येक वर्ष पडून होता. त्याचा धमाका होताच पाण्याने उसळी घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.In World War II in Poland Terrible explosion of a giant bomb
सप्टेंबर 2019मध्ये पोलंडमधील वायव्येकडील स्झ्केसिन येथे कालव्यात हा बॉम्ब असल्याचा सुगावा लागला होता. परंतु, तो निष्क्रिय करण्याचे प्रयत्न ऑक्टोबर 2020 पर्यंत झाले नाहीत.
नौदलाच्या सहाय्याने तो निष्क्रिय करण्याचे प्रयत्न सुरु असताना त्याचा पाण्यातच भीषण स्फोट झाला. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून स्फोटात वित्त अथवा जीवितहानी झाली नाही. कारण अगोदरच तशी काळजी घेतली होती. परिसरातील 750 रहिवाशांना स्थलांतरित केले होते. 2.4 किलोमीटरच्या परिघात प्रवेशबंदी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App