सत्ता गेल्यानंतर इम्रान यांचं पहिलं भाषण : म्हणाले- आता मी पूर्वीपेक्षा जास्त खतरनाक होईन, माझं सरकार पाडण्यासाठी मध्यरात्री उघडले सर्वोच्च न्यायालय!


पाकिस्तानचे माजी वझीर-ए-आझम आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान यांनी हातवारे करत न्यायालय आणि लष्कराला धमकी दिली आहे. सरकार पडल्यानंतर ते पहिल्यांदाच जनतेशी बोलले.Imran’s first speech after leaving power He said- now I will be more dangerous than before, the Supreme Court opened at midnight to overthrow my government


वृत्तसंस्था 

पाकिस्तान : पाकिस्तानचे माजी वझीर-ए-आझम आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान यांनी हातवारे करत न्यायालय आणि लष्कराला धमकी दिली आहे. सरकार पडल्यानंतर ते पहिल्यांदाच जनतेशी बोलले.

पेशावरच्या रॅलीत खान म्हणाले- अविश्वास ठराव मंजूर होण्याच्या काही वेळापूर्वीच मध्यरात्री सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे का उघडण्यात आले? सरकारमध्ये असताना मी धोकादायक नव्हतो, पण आता खूप खतरनाक होणार आहे.



9 एप्रिल रोजी अविश्वास ठराव मंजूर होण्यापूर्वी मध्यरात्री सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात कोणत्याही परिस्थितीत 9 एप्रिल रोजी या प्रस्तावावर मतदान घेण्याचे आदेश दिले होते.

मी आजपर्यंत कोणताही कायदा मोडलेला नाही

खान म्हणाले- हा देश मला 45 वर्षांपासून ओळखतो. मी आजपर्यंत कोणताही कायदा मोडला नाही. मी क्रिकेट खेळायचो तेव्हाही माझ्यावर कधी मॅच फिक्सिंगचा आरोप झाला नाही. मग मी असे काय केले की मध्यरात्री न्यायालयाचे दरवाजे उघडावे लागले?

सरकार पडण्यामागे परकीय षड्यंत्र असल्याचा दावा इम्रान यांनी पुन्हा एकदा केला. म्हणाले- ज्या लोकांनी हे षड्यंत्र केले त्यांना खूप आनंद होईल. मी सरकारमध्ये असताना धोकादायक नव्हतो, पण आता मी अत्यंत खतरनाक होईन.

जनता भ्रष्ट पंतप्रधानांना स्वीकारणार नाही

इम्रान म्हणाले- 1970 मध्ये तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांना परदेशी शक्तींच्या मदतीने हटवण्यात आले, पण हा जुना पाकिस्तान नाही. ते म्हणाले- नव्या पाकिस्तानचे लोक कधीही आयात केलेले सरकार स्वीकारणार नाहीत. शाहबाज शरीफ यांच्यावर सुमारे 40 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे आहेत. आमची जनता अशा व्यक्तीला देशाचा पंतप्रधान म्हणून स्वीकारणार नाही. आतापर्यंत पाकिस्तानात जेव्हा जेव्हा पंतप्रधान हटवले गेले तेव्हा लोकांनी जल्लोष केला, मात्र आता जेव्हा हटवण्यात आले तेव्हा संपूर्ण देशात निषेध झाला.

अविश्वास प्रस्ताव गमावणारे खान हे पहिले पंतप्रधान

इम्रान यांनी आपल्या सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावाला परदेशी षडयंत्र म्हटले होते. यादरम्यान त्यांनी अमेरिकेवर अनेकदा आरोप केले होते. तथापि, खान यांचे सर्व दावे अमेरिकेने फेटाळले आहेत. 9 एप्रिल रोजी अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर इम्रान हे पाकिस्तानचे असे पहिले पंतप्रधान ठरले, ज्यांना या पद्धतीने सत्तेतून बेदखल व्हावे लागले.

Imran’s first speech after leaving power He said- now I will be more dangerous than before, the Supreme Court opened at midnight to overthrow my government

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात