तोशाखाना प्रकरणात इम्रान खान दोषी, ५ वर्षे निवडणूक लढवता येणार नाही; इस्लामाबाद पोलिसांनी केली अटक!

इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानातील वातावरण तापण्याची चिन्हं

विशेष प्रतिनिधी

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी वाढल्या आहेत. इस्लामाबाद येथील एका ट्रायल कोर्टाने तोशाखाना प्रकरणात त्यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे, शिवाय एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. Imran Khan Convicted in Toshakhana Case  Can not Contest for 5 Years Islamabad police arrested

तर  दुसरीकडे इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयने दावा केला आहे की, इम्रान खान यांना त्यांच्या जमान पार्क येथील घरातून अटक करण्यात आली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर इम्रान खान यांची राजकीय कारकीर्द अडचणीत आली आहे. पुढील पाच वर्षे त्यांना निवडणूक लढवता येणार नाही. इस्लामाबाद पोलिसांनी इम्रान खान विरोधात अटक वॉरंट जारी केले होते. इम्रानच्या अटकेनंतर पाकिस्तानातील वातावरण तापू शकते.

जिओ न्यूज चॅनलच्या वृत्तानुसार, इम्रान खान यांच्या जमान पार्क येथील निवासस्थानी कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. जमान पार्क रोडवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. कोणत्याही मेळाव्यास परवानगी नाही. आंदोलकांना अटक केली जाईल.

याआधी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने तोशाखाना प्रकरणात दिलासा मागणारी इम्रान खान यांची याचिका फेटाळून लावली होती. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी तोशाखान्यातून ठेवलेल्या भेटवस्तूंचा तपशील ‘जाणूनबुजून लपवल्याचा’ आरोप आहे. आरोप सिद्ध झाल्यानंतर ट्रायल कोर्टाने निकाल दिला.

Imran Khan Convicted in Toshakhana Case  Can not Contest for 5 Years Islamabad police arrested

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात