Hijab Controversy in France : फ्रान्समध्ये नागरी निवडणुकांपूर्वी पुन्हा एकदा हिजाबवरून वाद सुरू झाला आहे. हिजाब परिधान केलेल्या महिला उमेदवाराने मत मागण्यासाठी रस्त्यावर उतरताच लोकांनी त्यांना विरोध करण्यास सुरुवात केली. वाढता वाद पाहून फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आपला पाठिंबा काढून घेतला. Hijab Controversy in France Local Body Election, Emmanuel Macron criticized for being anti-Muslim
वृत्तसंस्था
पॅरिस : फ्रान्समध्ये नागरी निवडणुकांपूर्वी पुन्हा एकदा हिजाबवरून वाद सुरू झाला आहे. हिजाब परिधान केलेल्या महिला उमेदवाराने मत मागण्यासाठी रस्त्यावर उतरताच लोकांनी त्यांना विरोध करण्यास सुरुवात केली. वाढता वाद पाहून फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आपला पाठिंबा काढून घेतला.
वास्तविक, अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या पक्षाने निवडणुकीत काही महिला उमेदवारांना उमेदवारी दिली होती, परंतु प्रचारासाठी या महिला हिजाब घालून रस्त्यावर आल्या की विरोध सुरू झाला. त्यानंतर अध्यक्षांच्या पक्षाने सर्वांचा पाठिंबा काढून घेतला. आता हे उमेदवार स्वतंत्रपणे मैदानात उतरले आहेत, परंतु इमॅन्युएल मॅक्रॉनच्या या निर्णयावर जगभरातून टीका होत आहे. लोक त्यांना मुस्लिम विरोधी म्हणत आहेत. तथापि, महिलांचे म्हणणे आहे की त्या त्यांच्या हक्कांसाठी लढा सुरूच ठेवतील. हार मानणार नाहीत.
हिजाबवरील वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा पक्ष लारेमने आता याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. पक्षाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, निवडणूक प्रचारादरम्यान धार्मिक चिन्हे दर्शवणाऱ्या प्रतीकांना किंवा वस्तूंना सूट मिळणार नाही, असे यापूर्वीच सांगण्यात आले होते. त्यामुळे असे करणाऱ्या उमेदवारांकडून पाठिंबा काढून घेण्यात आला आहे. लारेमचे प्रवक्ते रोलँड लेस्कूर यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, जेव्हा कोणी प्रचार पोस्टरवर धार्मिक प्रतीक टाकून निघतात तेव्हा तो राजकीय मुद्दा बनतो.
Hijab Controversy in France Local Body Election, Emmanuel Macron criticized for being anti-Muslim
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App