विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : बलात्काऱ्यांना भर चौकात फाशी द्यावी, अशी एकमुखी मागणी पाकिस्तानातील महिला खासदारांनी संसदेत केली आहे. ही मागणी करताना एका महिला खासदाराला रडूही कोसळले.Hang the rapists in Chowk, demand of women MPs in Pakistan
इस्लामाबादमध्ये नुकतीच एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या झाल्याची घटना घडली होती. लग्नाला नकार दिल्यामुळे एका बड्या व्यावसायिकाच्या मुलाने तिची हत्या केल्याचं समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.
नुकत्याच घडलेल्या एका बलात्कार प्रकरणाविषयी बोलताना पाकिस्तानच्या संसदेमध्ये एका महिला खासदाराला रडू कोसळले. त्यानंतर सर्व महिला खासदारांनी एकमुखाने संसदेसमोर आपली मागणी ठेवली आहे. यावेळी बोलताना खासदार म्हणाल्या,
बलात्काऱ्यांना शिक्षा देण्यासाठी कायदे असून देखील बलात्काराची प्रकरणं कमी होताना दिसत नाहीत. गुन्हेगारांना जरब बसणार नाही, तोपर्यंत असे प्रकार थांबणार नाहीत. त्यामुळे अशा विकृतांमध्ये शिक्षेचे भय निर्माण व्हावे, यासाठी कठोरात कठोर शिक्षेची तरतूद व्हायला हवी.
पाकिस्तानमधील सत्ताधारी पक्ष तेहरीक-ए-इन्साफच्या सर्व महिला खासदार, विरोधी पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज गटाच्या महिला खासदार आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या महिला खासदारांनी मिळून ही मागणी केली. खासदार सईदा इफ्तिकार म्हणाल्या,
आम्ही ६९ महिला खासदार बलात्काराच्या प्रकरणांमध्ये वेगवान खटला चालवून बलात्काऱ्याला भर चौकात फाशी देण्याची मागणी करत आहोत . जर पाकिस्तानला विकास साधायचा असेल, तर बलात्काऱ्यांना आणि खुन्यांना भर चौकात फाशी दिली जायला हवी, असे पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष असलेल्या तेहरीक-ए-पाकिस्तानच्या खासदार आस्मा कादिर यांनी म्हटले आहे.
जर अशा घटना रोखायच्या असतील, तर बलात्काऱ्यांना सगळ्यांसमोर फाशी द्यायला हवे. भविष्यात इस्लामाबादसारख्या घटना घडू नयेत, यासाठी बलात्काऱ्यांना कठोर शासन व्हायलाच हवे. लहान मुलांचं शोषण आणि महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहाता बलात्काऱ्यांना आणि खुन्यांना सगळ्यांसमोर फाशी देण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.
सरकारने नुकताच बलात्काराच्या प्रकरणात संदर्भात कायदा पारित केला. पण फक्त कायद्याने काही होणार नाही. कारण आता समाजाचा महिलांबाबतचा दृष्टीकोण बदलण्याची गरज आहे, असे मत महिला खासदारांनी व्यक्त केली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App