विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : फेसबुक या सोशल मीडिया व्यासपीठावरील ५० कोटींहून अधिक युजरची खासगी माहिती इंटरनेटवर उपलब्ध असल्याचे आढळून आले आहे. हॅकरकडून या माहितीची चोरी होण्याची भीती व्यक्त होते आहे.Hackers can use data of Face book users
सोशल मीडिया कंपन्यांकडून ज्या प्रचंड प्रमाणात माहिती गोळा केली जाते, ती कितपत सुरक्षित राखली जाते, असा सवाल या घटनेनंतर विचारला जात आहे.‘बिझनेस इनसायडर’ या संकेतस्थळाने ही बाब उघडकीस आणली.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंटरनेटवर १०६ देशांमधील ५० कोटींहून अधिक युजरचे दूरध्वनी क्रमांक, फेसबुक आयडी, पूर्ण नाव, लोकेशन, जन्मतारीख आणि ईमेल ॲड्रेस अशी माहिती उपलब्ध आहे. डाटा सुरक्षेसाठी ‘फेसबुक’ अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे.
केम्ब्रिज ॲनालिटिका या राजकीय सल्लागार कंपनीने ‘फेसबुक’च्या परवानगीशिवाय ८.७० कोटी युजरची माहिती मिळविली होती. या घटनेनंतर २०१८ मध्ये फेसबुकने मोबाईल क्रमांकावरून युजर शोधण्याची सुविधा बंद केली होती. डिसेंबर २०१९ मध्येही युक्रेनमधील एका कंपनीला फेसबुकच्या २७ कोटी युजरची माहिती फेसबुकवर आढळली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App