विशेष प्रतिनिधी
जीनिव्हा – जागतिक तापमानवाढीची समस्या मोठी असल्याने आणि याबाबतीत वारंवार आवाहन करूनही अनेक देशांकडून अपेक्षित हालचाल होत नसल्याने गुटेरेस यांनी नाराजी व्यक्त केली आहे.Global warming is dangerous problem
औद्योगिकीकरणपूर्व कालखंडाच्या तुलनेत जागतिक तापमानवाढ १.५ अंश सेल्सिअसपर्यंत नियंत्रित ठेवण्याचे उद्दीष्ट समोर ठेवण्यात आले असून ते साध्य करणे अत्यावश्यरक असल्याचेही गुटेरेस यांनी सांगितले. यात अपयश असल्यास होणारे परिणाम अधिक भयंकर होतील, असा इशाराही त्यांनी दिला.
पुढील आठवड्यात संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या ७६ व्या सत्राला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर गुटेरेस यांनी पर्यावरण बदलाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेणारा एका अहवाल प्रसिद्ध केला. यावेळी गुटेरेस म्हणाले,‘‘पर्यावरण बदलाचा वेग अपेक्षेपेक्षा अधिक आहे. जैविक इंधनाचा वापर प्रचंड वाढला आहे. अमेरिकेला एकामागून एक बसणारे वादळाचे तडाखे, युरोपमधील पूरस्थिती, कॅनडामधील उष्णतेची लाट ही सर्व तीव्र बदलांची उदाहरणे आहेत.
कोणताही देश पर्यावरण बदलाच्या परिणामांपासून सुरक्षित नाही. भविष्यातील भयानक परिस्थितीची ही केवळ सुरुवात आहे. त्यामुळे पर्यावरण बदलाचा वेग कमी करण्यासाठी सर्व देशांनी हरीतगृह वायूंचे उत्सर्जन तातडीने कमी करणे अत्यावश्य्क आहे.’’
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App