अमेरिकेचे राजकारण हादरवणाऱ्या वॉटरगेट प्रकरणाचे सूत्रधार जी गॉर्डन लिडी कालवश

विशेष प्रतिनिधी 

वॉशिंग्टन :  अमेरिकेच्या राजकारणामध्ये कधीकाळी मोठी उलथापालथ घडवून आणणाऱ्या वॉटरगेट प्रकरणाचे सूत्रधार आणि रेडिओवरील टॉक शोचे निवेदक जी गॉर्डन लिडी (वय ९०) यांचे मंगळवारी निधन झाले.G. Gordon lidi passed away

लिडी यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. लिडी हे अमेरिकी गुप्तहेर संस्था एफबीआयचे एजंट होते.वॉटरगेट प्रकरण उघड झाल्यानंतर त्यांच्यावर कारस्थान रचणे, चोरीच्या उद्देशाने घुसखोरी करणे,बेकायदा संभाषण ऐकणे आदी ठपके ठेवण्यात आले होते. वॉटरगेट प्रकरण उघड झाल्यानंतर तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना राजीनामा द्यावा लागला होता. लिडी यांना याच प्रकरणामध्ये चार वर्षे आणि चार महिन्यांचा तुरुंगवास देखील भोगावा लागला होता.

निक्सन यांच्या काळामध्ये लिडी यांनी अमेरिकी प्रशासनाला केलेल्या अनेक सूचनांवरून वाद निर्माण झाला होता. यामध्ये राजकीय शत्रूंची हत्या करणे, डाव्या विचारवंतांवरील बॉम्ब हल्ले तसेच युद्धाविरोधात आंदोलन करणाऱ्यांचे अपहरण या त्यांच्या शिफारशींमुळे ते वादात सापडले होते.

G. Gordon lidi passed away

 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*