फेसबुकमुळे समाजात निर्माण होतोयं तिरस्कार तसेच मुलांवरही विपरीत परिणाम


विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन – ‘फेसबुक’ आणि या कंपनीच्या मालकीच्या इतर सोशल मीडियाचा लहान मुलांवर विपरित परिणाम होत असून अमेरिकेत यामुळे ध्रुवीकरण होत आहे, असा दावा ‘फेसबुक’च्याच एका माजी माहिती शास्त्रज्ञाने अमेरिकी काँग्रेससमोर केला. फ्रान्सेस हॉगन यांचा अमेरिकी सिनेटच्या ग्राहक संरक्षण समितीसमोर जबाब झाला.Face book comes in controversy

‘फेसबुक’ची धोरणे न पटल्याने हॉगन या राजीनामा देत कंपनीतून बाहेर पडल्या. मात्र, गप्प न बसता त्यांनी ‘फेसबुक’वर आरोपांची तोफ डागली. नोकरी सोडण्यापूर्वी त्यांनी बालकांवर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देणारी अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांच्या प्रती गोपनीयरित्या काढून घेतल्या.



त्याआधारावर त्यांनी फेसबुकविरोधात अधिकृत तक्रारही नोंदविली. ‘फेसबुक’च्या माध्यमातून द्वेष, अफवा आणि राजकीय अराजकता पसरत असल्याचे या कंपनीनेच केलेल्या संशोधनातून दिसून येत असतानाही कंपनीने ही बाब लपवून ठेवली, असे हॉगन यांनी त्यांच्या आरोपांमध्ये म्हटले आहे. ‘फेसबुक’च्या सर्व चुकीच्या कृत्यांची जबाबदारी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांच्यावर आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.

फेसबुकमुळे समाजात तिरस्कार निर्माण होऊन लोकशाही कमकुवत होत आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे ग्राहकांसाठी अधिक सुरक्षित कसे करायचे, हे कंपनीला चांगलेच माहिती आहे. मात्र, त्यांना तोटा होण्याची भीती वाटते. या प्रकाराविरोधात सरकारने ठामपणे पाऊल उचलणे आवश्याक आहे,’’ असे हॉगन म्हणाल्या. हॉगन यांनी अत्यंत सविस्तर माहिती देताना फेसबुकच्या चुकीच्या वर्तणूकीचा पाढा वाचला.

Face book comes in controversy

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात