G-20 च्या राष्ट्रप्रमुखांनो, आपणच आपल्या कबरी खोदतोय!!; जागतिक हवामान बदल परिषदेत संयुक्त राष्ट्र संघाच्या सरचिटणीसांचे परखड बोल


वृत्तसंस्था

ग्लासगो : जागतिक हवामान बदल परिषदेत संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस अँटोनियो गुट्रोस यांनी आज जी-20 मधील सर्व राष्ट्र प्रमुखांना अत्यंत परखड भाषेत पृथ्वीचा संतापच जणू सुनावला.Enough of brutalising biodiversity, enough of killing ourselves with Carbon, enough of treating nature like a toilet, enough of burning

अँटोनियो गुट्रोस म्हणाले, की आपणच आपल्याला कार्बनने मारतो आहोत. जैवविविधतेचीच पिळवणूक करतो आहोत. कचऱ्यावर कचरा टाकून संपूर्ण पृथ्वीला आपण टॉयलेट बनवून टाकले आहे. खाणकाम करून, जागोजागी खोदून आपण संपूर्ण मानव वंशाच्याच नव्हे, तर सर्व प्राणीसृष्टीच्या कबरी आपल्या हातानेच खोदतो आहोत. हे आपल्या लक्षात येते आहे काय? आपल्या डोळ्यासमोर पृथ्वी नष्ट होताना आपण पाहतो आहोत. आता हे बस्स झाले हे म्हणायची वेळ आली आहे, असे परखड बोल अँटोनियो गुट्रोस यांनी सर्व राष्ट्र प्रमुखांना ऐकविले आहेत.

– जेम्स वॅटने वाफेवरचे मशीन बनविलेल्या ग्लासगो मध्ये परिषद सुरू

प्रख्यात ब्रिटिश शास्त्रज्ञ जेम्स वॅटने 250 वर्षांपूर्वी ज्या शहरात वाफेचे मशीन बनवले त्या ग्लासगो मध्ये जागतिक हवामान बद्दल परिषद सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि g20 देशांचे राष्ट्रप्रमुख या परिषदेत सहभागी झाले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुट्रोस यांच्या प्रमुख भाषणाने या परिषदेला सुरुवात झाली आहे.

भूमी अंतर्गत ऊर्जास्रोतांच्या ज्यादा वापरामुळे आपण सर्वांनी पृथ्वीला तापमान वाढीच्या धोक्यामध्ये आणून सोडले आहे, अशी आत्मटीका गुट्रोस यांनी केली आहे. आपण सगळे जागतिक तापमान वाढीला जबाबदार असू तर ही आपल्यावरच जबाबदारी आहे की हे तापमान कमी करण्यासाठी आपण अपारंपारिक ऊर्जा क्षेत्राचा विस्तार केला पाहिजे आणि इकोफ्रेंडली ऊर्जेचा वापर वाढविला पाहिजे, यावर गुट्रोस यांनी भर दिला.

6 वर्षांपूर्वी पॅरिस जागतिक हवामान बदल करार झाल्यानंतर 2021 हे वर्ष जगातले सगळ्यात जास्त तापमान वाढीचे वर्ष ठरले आहे आता हे बस्स झाले असे म्हणण्याची वेळ आली आहे असा इशारा देखील गुट्रोस यांनी सर्व राष्ट्र प्रमुखांना दिला.

ब्रिटिश पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी सर्व राष्ट्र प्रमुख यांचे स्वागत केले. त्यावेळी त्यांनी जेम्स वॅट यांनी बनविलेल्या वाफेच्या मशीनची आठवण सर्व राष्ट्र प्रमुखांना करून दिली.

Enough of brutalising biodiversity, enough of killing ourselves with Carbon, enough of treating nature like a toilet, enough of burning

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!