दुबईने केली पेपरलेस होण्याची किमया शंभर टक्के साध्य

विशेष प्रतिनिधी

दुबई – सरकारी कामकाजात कागदाचा कमीत कमी वापर करण्यासाठी अनेक देश कमी-अधिक प्रमाणात प्रयत्न करत असताना दुबईने शंभर टक्के पेपरलेस होण्याची किमया साध्य केली आहे.Dubai became paperless very fastly

सरकारी कामकाजातील कागदाचा वापर पूर्ण बंद झाल्याने १.३ अब्ज दिऱ्हाम (३५ कोटी डॉलर) आणि १.४ कोटी मनुष्यतास वाचल्याचा दावा दुबईचे युवराज शेख हामदान बिन महंमद बिन रशीद अल मख्तुम यांनी केला आहे.



दुबईमधील सरकारचे सर्व अंतर्गत आणि बाह्य व्यवहार, प्रक्रिया आणि इतर जनसुविधांची कामे शंभर टक्के डिजिटल पद्धतीने होत आहेत. सर्व व्यवहारांवर सरकारची डिजिटल पद्धतीनेच देखरेख आहे.

‘जीवनाच्या सर्व क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या प्रवासातील हा सर्वांत महत्त्वाचा टप्पा पार झाला असून आता भविष्यावर लक्ष केंद्रीत करून संशोधन आणि सर्जनशीलता यांचा आधार घेत वाटचाल करण्यावर आमचा भर असेल.

जगातील आघाडीवरील डिजिटल राजधानी म्हणून दुबईने स्थान निर्माण केले असून जगातील इतर शहरांसाठी एक आदर्श प्रस्थापित केला आहे,’ असे शेख हामदान यांनी सांगितले.

सरकारी कामकाज डिजिटल स्वरुपात सुरु करण्याचे अमेरिका, ब्रिटन, युरोप आणि कॅनडा या देशांचे नियोजन आहे. मात्र, सायबर हल्ल्याच्या भीतीने या सर्व देशांमध्ये शंभर टक्के डिजिटल कामकाजाला विरोध होत आहे.

Dubai became paperless very fastly

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात