वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या मध्यपश्चिम आणि दक्षिण भागात आलेल्या विनाशकारी चक्रीवादळांमुळे किमान 32 जणांचा मृत्यू झाला आहे, अनेक जखमी झाले. या चक्रीवादळामुळे 11 राज्यांमध्ये नुकसान झाले आहे. हजारो घरे उद्ध्वस्त झाली. त्याचबरोबर या वादळामुळे लाखो घरांतील वीज गेली आहे.Cyclone ravages 11 states in America, so far 32 people have died, many injured
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या वादळांमुळे झालेल्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, आम्ही संपूर्ण परिस्थितीचे मूल्यांकन करत आहोत. मृतांच्या प्रियजनांबद्दल आम्हाला सहानुभूती आहे. यावेळी मृतांच्या कुटुंबियांना काय त्रास होत असेल हे आम्हाला माहीत आहे. यापूर्वी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी देशातील अनेक भागांना प्रमुख आपत्ती क्षेत्र म्हणून घोषित केले होते. वेगवेगळ्या राज्यात लोकांचा मृत्यू झाला आहे. आर्कान्सामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला.
कुठे किती मृत्यू?
प्रशासनाने आणीबाणी जाहीर करून नॅशनल गार्ड सक्रिय केले होते. टेनेसी काउंटीमध्ये 9 लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय अर्कान्सासच्या विनमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, इंडियाना आणि इलिनॉयमध्ये अनुक्रमे 5 आणि 4 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय शनिवारी अलाबामा आणि मिसिसिपीमध्ये काही मृत्यू झाल्याची बातमी आली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App