विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : आपण हिंदू असल्याने पाकिस्तान क्रिकेट संघात आपला छळ झाला. हिन वागणूक देण्यात आली, असा आरोप पाकिस्तानचा माजी लेगस्पिनर दानिश कनेरिया याने केला आहे. कर्णधार शाहिद आफ्रिदी याने पाकिस्तानी क्रिकेट संघासाठी एकत्र क्रिकेट खेळताना हिंदू असल्याने गैरवर्तन केले. आफ्रिदी हा चरित्रहिन आणि खोटारडा आहे. पाकिस्तान क्रिकेट बोडार्ला (पीसीबी) स्पॉट-फिक्सिंगच्या आरोपांमुळे घातलेली आजीवन बंदी उठवण्याची विनंती कनेरिया याने केली आहे.Cricketer Danish Kaneria accused of persecuting in Pakistan for being a Hindu, Shahid Afridi’s plot involved in fixing
41 वर्षीय पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया म्हणाला की, 2013 मध्ये त्याच्यावर लावलेले स्पॉट-फिक्सिंगचे आरोप खोटे आहेत आणि त्यामुळे त्याच्यावरील बंदी उठवून त्याला संधी दिली पाहिजे. पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तरनेही दानिश कनेरियाला हिंदू असल्यामुळे पाकिस्तानी संघाने अन्यायकारक वागणूक दिल्याचे म्हटले होते.
कनेरिया म्हणाले की, पाकिस्तान संघाचा कर्णधार शाहिद आफ्रिदीने त्याच्याविरुद्ध कट रचला होता. शाहिद आफ्रिदी नेहमीच मला बसवून ठेवायचा. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळायची संधी द्यायचा नाही.शाहिद आफ्रिदीला आपल्या चांगल्या कामगिरीचा हेवा वाटला आणि त्याने इतर खेळाडूंना भडकवले असा आरोप करून कनेरिया म्हणाला,
शाहिद आफ्रिदी चारित्र्यहीन आणि खोटा माणूस आहे. तो कर्णधार नसता तर 18 एकदिवसीय सामन्यांपेक्षा खूप जास्त सामने खेळलो असतो. माझ्यावर स्पॉट फिक्सिंगचे खोटे आरोप करण्यात आले. माझे नाव या प्रकरणात सहभागी असलेल्या व्यक्तीशी जोडले गेले होते. आफ्रिदीसह इतर पाकिस्तानी क्रिकेटपटूंचाही तो मित्र होता, पण त्यात माझाही समावेश होता. मी कोणत्याही प्रकारच्या फिक्सिंगमध्ये सहभागी झालो नाही.
कनेरिया म्हणाले की, शोएब अख्तर हा पहिला व्यक्ती आहे ज्याने आपली जाहीर बाजू घेतली अख्तरने उघडपणे कनेरियाला हिंदू असल्याच्या कारणावरून संघात वाईट वागणूक दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अनेक अधिकाºयांनी अख्तरवर दबाव आणला. पाकिस्तानकडून खेळणे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असून त्यासाठी मी पीसीबीचा आभारी आहे. अनेक फिक्सर्सवरील बंदी उठवण्यात आली आहे.
दानिश कनेरियाला 2012 मध्ये इंग्लिश काउंटी चॅम्पियनशिप प्रो-लीग सामन्यांमध्ये स्पॉट फिक्सिंगच्या दोन आरोपांमुळे इंग्लिश आणि वेल्स क्रिकेट बोडार्ने सर्व क्रिकेटमधून आजीवन बंदी घातली होती. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोडार्ने त्याला निलंबित केले. असते. कनेरियाने आपल्या 62 कसोटी सामन्यांमध्ये 261 विकेट्स आणि 18 एकदिवसीय सामन्यांमध्ये 15 बळी घेतले.
पाकिस्तानातील कराची शहरातील अत्यंत गरीब घरात जन्मलेल्या दानिश कनेरियाने 2000 ते 2010 दरम्यान 61 कसोटी सामने खेळले आणि 34.79 च्या सरासरीने 261 बळी घेतले. कनेरिया हा पाकिस्तानसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा फिरकी गोलंदाज आहे आणि वसीम अक्रम (414), वकार युनूस (373), आणि इम्रान खान (362) नंतर पाकिस्तानी गोलंदाजांच्या यादीत चौथा आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App