जगातून यावर्षी कोरोना होणार हद्दपार, जागतिक आरोग्य संघटनेची खूषखबर


विशेष प्रतिनिधी

न्यूयॉर्क – कोरोना विषाणूच्या साथीतून २०२२मध्ये जग मुक्त होऊ शकते, अशी आशा दाखवत जर आपण एकत्रितपणे लशीतील विषमता दूर करू शकलो तर हे शक्य होईल, असे प्रतिपादन जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष टेड्रोस अधनोम घेब्रेयेसूस यांनी नववर्षाचा संदेश देताना केले.corona will finish this year

ते म्हणाले, ‘‘लशींतील असमानता प्रदीर्घ काळ कायम राहिल्यास या विषाणूच्या फैलावाचा धोका एवढा मोठा आहे की, आपण तो थोपवू शकत नाही किंवा त्याला अटकावही घालता येणार नाही. पण जर ही विषमता, असमानता संपुष्टात आणली तर ही साथही नष्ट होईल. यासाठी विकसित देशांनी त्यांच्याकडील लशींचा साठ दुसऱ्या देशांना दिला पाहिजे.



‘‘कोरोना प्रतिबंधक लशींच्या असमानतेमुळेच ओमिक्रॉनसारखे कोरोनाचे प्रकार निर्माण होण्यास पोषक परिस्थिती निर्माण झाली. कोरोनामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्यासंबंधीच्या समस्यां जगभरातील नागरिकांना पुढील वर्षी भेडसावतील.

नियमित लसीकरणाला लाखो लोक मुकतील, कुटुंब नियोजन, संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोगांवरील उपचार त्यांना उपलब्ध होऊ शकणार नाहीत,’’ अशी शक्यताही त्यांनी वर्तविली.

corona will finish this year

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात