विशेष प्रतिनिधी
कॅलिफोर्निया – चीनमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला असे, मानले जाते. कोविड १९ या आजाराला कारणीभूत असलेला ‘सार्स -सीओव्ही-२’ या विषाणूचा संसर्ग चीनमध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या मध्यावर झाला होता, असा दावा नव्या संशोधनात केला जात आहे. Corona virus foun in china not in dec. but in Oct.
कोरोनाचा पहिला रुग्ण डिसेंबर २०१९ मध्ये आढळल्याची अधिकृतपणे जाहीर केली असली तरी चीनमध्ये ऑक्टोबर २०१९च्या प्रारंभीच या कोरोनाचा फैलाव झाला होता, असे या संशोधनात म्हटले आहे.
चीनमध्ये ऑक्टोबर २०१९ मध्ये कोरोनाची लागण सुरू झाली होती, नोव्हेंबरमध्ये त्याचा प्रसार झाला आणि जानेवारी २०२०पर्यंत तो वेगाने जगभरात वेगाने पसरला, असे ब्रिटनच्या केन्ट विद्यापीठाने केलेल्या संशोधनात नमूद केले आहे. चीनमध्ये कोरोनाचा प्रसार झाल्याचा संभावित तारीख १७ नोव्हेंबर २०१९ असून त्यानंतर जानेवारी २०२१ पर्यंत याचे संक्रमण संपूर्ण जगात झाले.
पण चीनने कोरोनाचा प्रसार डिसेंबर २०१९ मध्येच आल्याचे जाहीर करीत जगाला या साथीबद्दल प्रथमच माहिती दिली होती. सुरुवातीला वुहानमधील हुआनन सीफूड बाजारातून याचा संसर्ग झाल्याचे मानले जात होते. पण त्याचा काही संबंध नसल्याचे निदर्शनास आले.
Corona virus foun in china not in dec. but in Oct.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App