हमासकडून इस्त्रायलवर कंडोम बॉम्ब, निरोधचा वापर शस्त्रासारखा


इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्ष अद्यापही सुरूच आहे. हमासच्य सदस्यांकडून इस्त्रायलवर कंडोम बॉम्ब सोडले जात आहेत. यामध्ये निरोधचा वापर शस्त्रासारखा केला जात आहे. निरोधमध्ये हवा भरून त्यामध्ये कोळसा व इतर ज्वलनशील पदार्थ, स्फोटके भरून इस्रायलच्या हद्दीत सोडली जात आहेत. ज्या भागात हे फुगे फुटतात, त्या ठिकाणी स्फोट होतात आणि आग लागते. दक्षिण इस्रायलमध्ये असे फुगे फुटल्याने आगी लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.Condom bombs on Israel from Hamas, the use of condoms as a weapon


विशेष प्रतिनिधी

तेल अव्हिव : इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्ष अद्यापही सुरूच आहे. हमासच्य सदस्यांकडून इस्त्रायलवर कंडोम बॉम्ब सोडले जात आहेत. यामध्ये निरोधचा वापर शस्त्रासारखा केला जात आहे. निरोधमध्ये हवा भरून त्यामध्ये कोळसा व इतर ज्वलनशील पदार्थ, स्फोटके भरून इस्रायलच्या हद्दीत सोडली जात आहेत.

ज्या भागात हे फुगे फुटतात, त्या ठिकाणी स्फोट होतात आणि आग लागते. दक्षिण इस्रायलमध्ये असे फुगे फुटल्याने आगी लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.या बॉम्बमुळे इस्रायलमधील हजारो एकरवरील शेतीचे नुकसान झाले आहे.नागरिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.इस्त्रायली सैन्याच्या म्हणण्यानुसार या निरोध फुग्याचा हेतू लोकांना मारणे आणि विनाश करणे आहे. लहान मुले बºयाचदा या फुग्यांना फसतात. त्यांच्याकडून या फुग्याला स्पर्श केला जातो आणि स्फोट होतो. या फुग्यांच्या स्फोटात लहान मुलेही जखमी झाले आहेत.

पॅलेस्टाइनमधील सशस्त्र गट हमासने इस्रायलमध्ये ज्वलनशील फुगे सोडल्यानंतर इस्रायलने प्रत्युत्तरात हवाई हल्ले केले. मागील महिन्यात २१ मे रोजी इस्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये शस्त्रसंधी झाली होती. त्यानंतर हे हल्ले झाले. हमासने इस्रायलच्या हद्दीत कंडोम बॉम्ब सोडल्यामुळे प्रत्युत्तरात कारवाई करण्यात आली असल्याचे इस्रायलच्या अधिकाºयांनी म्हटले. यामध्ये हमासच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले.

फक्त निरोध नव्हे तर घरी तयार करण्यात येणाºया पतंगाद्वारेही हमास इस्रायलमध्ये स्फोट घडवतात. पतंगांमध्ये स्फोटके लावलेली असतात. पतंग पडल्यानंतर त्या भागामध्ये आग लागते. हमासकडून सोडण्यात येणाऱ्या फुग्यांवर, निरोधवर अनेकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा लिहिलेल्या असतात.

काही फुग्यांवर आय लव्ह यू सारखे संदेशही लिहिलेले असतात. जेणेकरून लोकांनी स्फोटके असलेले फुगे पकडावीत आणि त्याचा स्फोट व्हावा. अशा प्रकारचे फुगे आढळल्यानंतर इस्रायलमधील पोलीस, सुरक्षा यंत्रणा त्यांचा सुरक्षितपणे स्फोट घडवून आणतात. इस्रायलच्या हद्दीत हे फुगे पडावेत यासाठी हमासला भूमध्य सागरातून वाहणाºया हवेचा मोठा फायदा होतो.

Condom bombs on Israel from Hamas, the use of condoms as a weapon

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण