विशेष प्रतिनिधी
बीजिंग : घटनेत बदल करून चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांची तिसरी कारकिर्द व त्यापुढील वाटचालीचा मार्ग मोकळा करणारा प्रस्ताव चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या अधिवेशनात एकमताने संमत करण्यात आला. त्यामुळे क्षी जिनपिंग यांचे स्थान अधिक मजबूत झाले असून, ते पुढची अनेक वर्षे राष्ट्राध्यक्षपदी राहणार असल्याचेही निश्चित झाले आहे.Chinese President Xi Jinping is the only dictator, paving the way for a third term
चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने आपल्या शंभर वर्षांच्या इतिहासात असा ठराव त्या पक्षाचे संस्थापक माओ झेडाँग, डेंग झिआओपिंग यांच्याबाबतच केला होता. आता त्या मालिकेत जिनपिंग यांची वर्णी लागली आहे. त्यांची राष्ट्राध्यक्षपदाची तिसरी कारकिर्द पुढील वर्षी सुरू होणार आहे. क्षी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखाली चीनने नेत्रदीपक प्रगती केली आहे.
त्यामुळे त्यांनी तिसºयांदाही राष्ट्राध्यक्षपदी विराजमान व्हावे, अशी सर्वांची इच्छा असल्याचे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने म्हटले आहे. या पक्षाच्या अधिवेशनाला सुमारे ४०० वरिष्ठ नेते उपस्थित होते. क्षी जिनपिंग हे ६८ वर्षांचे असून २०१२ साली ते चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख झाले. त्यानंतर राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे त्यांच्याकडे आली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App