चिनी कामगारांवर हल्ले : पाकिस्तानी संरक्षण क्षमतेवर चीनचा विश्वास डळमळीत!! परकीय गुंतवणुकीला पाकिस्तानात धोका!!

 वृत्तसंस्था

इस्लामाबाद : पाकिस्तानात “बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह” प्रकल्पावर काम करणाऱ्या चिनी कामगारांवर हल्ले होत आहेत. या हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याने चिनी राजवटीचा पाकिस्तानी राजवटीच्या संरक्षण क्षमतेवरचा विश्वास डळमळीत झाला आहे. पाकिस्तानी राजवट चीनमधील कामगारांचे संरक्षण करू शकत नाही. पर्यायी व्यवस्था केली पाहिजे, अशा मनोधारणा चिनी राज्यकर्त्यांमध्ये बळावत आहे आणि पाकिस्तानात परकीय गुंतवणूक मिला हा सर्वात मोठा धोका आहे, असा इशारा पाकिस्तानी सेनेटच्या संरक्षण समितीचे अध्यक्ष मुशाहिद हुसेन दिला आहे. China’s faith in Pakistan’s defense capability shakes!

कराचीतील कन्फ्यूशियस सेंटरच्या गेटवर बलूच स्वातंत्र्यसैनिक महिलेने आत्मघाती हल्ला करत 3 चिनी कर्मचाऱ्यांचा बळी घेतला होता. 26 एप्रिल ला हा हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर चीनमधील कम्युनिस्ट राजवटीने पाकिस्तानबाबत गंभीर विचार सुरू केला आहे. पाकिस्तानची राजवट चीनच्या कामगारांचे संरक्षण करू शकत नाही. भविष्यातही ती कितपत संरक्षण करू शकेल?, याविषयी त्यांचा विश्वास डळमळीत झाला आहे. आपल्या कामगारांच्या संरक्षणासाठी चीन पर्यायी व्यवस्था करण्याच्या वेळ प्रयत्नात आहे अशी माहिती मुशाहिद हुसेन यांनी डॉन वृत्त समूहाला दिली.

26 एप्रिलच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी खासदारांच्या शिष्टमंडळासह चिनी दूतावासाला भेट देऊन मृतांना श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी चिनी दूतावासातील अधिकाऱ्यांनी या शिष्टमंडळाला पाकिस्तानच्या संरक्षण अक्षमतेवर स्पष्ट शब्दात सुनावले. त्याचाच अर्थ चीन पाकिस्तानातल्या आपल्या कामगारांच्या संरक्षणासाठी पर्यायी व्यवस्था करण्याच्या विचारात आहे, हेच लक्षात येते, असे मुशाहिद हुसेन यांनी म्हटले आहे.

– चीन – पाकिस्तान आणि बलूच

चीन आणि पाकिस्तान यांच्यात संरक्षण आणि सामरिक संधी आहे. चीनच्या अतिमहत्त्वाकांक्षी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह प्रकल्पात पाकिस्तानचा सहभाग आहे. परंतु, पाकिस्तानची खनिजसंपत्ती वापरून चीन स्वतःची समृद्धी करू पाहतो आहे, असा बलूच स्वातंत्र्यवाद्यांचा आरोप आहे. त्यामुळे बलूच स्वातंत्र्यवादी असा थेटपणे चीनी कामगारांना आपले लक्ष्य करत आहेत.

  •  बलूचिस्तान मधून बॅट अँड रोड प्रकल्पाचा महत्त्वाचा रस्ता जातो. त्याच्या बांधकामात फक्त चिनी कामगारांचा सहभाग आहे पाकिस्तानी कामगारांना तेथे काम मिळत नाही.
  •  त्यामुळे या बांधकामात बलूच स्वातंत्र्यवादी त्यामध्ये अडथळे आणत असतात. पाकिस्तानी बेल्ट अँड रोड या कामात पंजाबी सैनिकांना संरक्षणासाठी कैनात केले आहे. पंजाबी सैनिक आणि बलूज स्वातंत्र्यवादी यांच्यात या परिसरात नेहमी संघर्ष होत असतो. या संघर्ष अनेकदा चिनी कामगार मारले जातात अथवा लक्ष्य होतात.
  •  या पार्श्वभूमीवर चिनी कम्युनिस्ट राजवटीला आता यावर पाकिस्तानी राजवटीच्या संरक्षण क्षमतेवर विश्वास उरलेला नाही, हेच यातून स्पष्ट होताना दिसत आहे.
  •  चिनी कामगारांवर असे हल्ले सतत होत राहिले तर चिनी कम्युनिस्ट राजवटीचा पाकिस्तानवर असा विश्वास तर डळमळीत होईलच, पण त्या पलिकडे जाऊन बाकीच्या देशांना आपल्या गुंतवणुकीला पाकिस्तानात धोका असल्याची भीती निर्माण होईल आणि बाकीच्या देशांमधले गुंतवणूकदार पाकिस्तानातून आपली गुंतवणूक काढून घेतील. हा सर्वात भयावह धोका आहे.
  • – पाकिस्तानची आर्थिक हालत प्रचंड खस्ता असताना एका डॉलरचीही परकीय गुंतवणूक पाकिस्तान बाहेर जाऊ देणे म्हणजे पाकिस्तानने आर्थिक आत्महत्या करण्यासारखे आहे आहे, असा इशारा मुशाहिद हुसेन यांनी दिला आहे.

China’s faith in Pakistan’s defense capability shakes!