ढोंगी चीनची कुटिल चाल : भारतात वैद्यकीय सामग्री घेऊन येणाऱ्या विमान सेवांना रोखले ; ऑक्सिजन उपकरणांच्या किंमती वाढवल्या;चीनचा खरा चेहरा उघड


कोरोनाविरुद्धच्या लढाईत चीनने भारताला साथ देण्याचे आश्वासन दिले होते .पण मदत करण्यापूर्वी कुटिल चाल खेळत चीनने पुन्हा आपला खरा चेहरा दाखवला आहे.


भारतातील करोना स्थितीचे कारण देत चीनच्या सिचुआन एअरलाइन्सने भारतात येणार्या  कार्गो विमानांना स्थगिती दिली आहे.


विशेष प्रतिनिधी

बीजिंग: करोनाच्या संकटाचा सामना करणाऱ्या भारताला मदतीचा हात देण्याची घोषणा करणाऱ्या चीनने पुन्हा एकदा धोका दिला आहे. चीनची सरकारी विमान कंपनी सिचुआन एअरलाइन्सने आपल्या सर्व कार्गो फ्लाइट्स १५ दिवसांसाठी स्थगित केल्या आहेत. या विमानांच्या माध्यमातून भारतासाठी अत्यावश्यक असणारी वैद्यकीय सामग्री पाठवण्यात येणार होती.China’s Airline Suspends Cargo Flights Bringing Medical Supplies To India

चीनने सध्या भारताला वैद्यकीय उपकरणे पुरवण्यास नकार दिला आहे. चीनच्या सरकारी मालकीच्या सिचुआन एअरलाइन्सने भारतातील सर्व मालवाहतूक (मालवाहू) उड्डाणे पुढील 15 दिवसांसाठी तहकूब केली आहेत. सिचुआन चुआनहांग लॉजिस्टिक कॉर्पोरेशन लिमिटेडने पत्र पाठवून ही माहिती दिली आहे.

चिनी उत्पादकांनी ऑक्सिजन संबंधित उपकरणांच्या किंमती वाढवल्या ३५ ते ४० टक्के वाढवल्या असल्याचे समोर आले आहे. इतकंच नव्हे तर भारतात सामग्री पाठवण्यासाठीचे शुल्कदेखील २९ टक्क्यांनी वाढवले आहे. शांघायमध्ये मालवाहतूक करणारी कंपनी सायनो ग्लोबल लॉजिस्टिकचे सिद्धार्थ सिन्हा यांनी पीटीआयला सांगितले की, सिचुआन एअरलाइन्सच्या निर्णयामुळे दोन्ही देशांतील कंपन्या, उद्योगपतीदरम्यान ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करणे आणि भारतात पाठवणे यामध्ये अडथळा निर्माण होणार आहे.

सिचुआन एअरलाइन्सचा भाग असलेल्या सिचुआन चुआनहांग लॉजिस्टिक कॉर्पोरेशन लिमिटेडने जारी केलेल्या निवेदनानुसार, विमान कंपनीने शिआन-दिल्लीसह सहा मार्गांवरील आपली कार्गो सेवा स्थगित केली आहे. हा निर्णय दोन्ही देशांमधील उद्योगजकांमध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्याची चर्चा सुरू असताना हा निर्णय घेण्यात आला. चीनची विमान कंपनी आगामी १५ दिवसांत आपल्या निर्णयाचा फेरआढावा घेणार असल्याचे कंपनीने म्हटले.

चीनकडून कार्गो विमाने स्थगित करण्यात आल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. ही वैद्यकीय सामग्री भारतात आणणे आणखी आव्हानात्मक होणार आहे. या सामग्री सिंगापूर अथवा अन्य मार्गे पाठवल्या तरी अत्यावश्यक वैद्यकीय सामग्री पोहचण्यास उशीर होणार आहे. भारतातील करोना स्थितीचे कारण देत विमान स्थगित करणे आश्चर्यजनक असल्याचेही व्यापाऱ्यांनी म्हटले.

China’s Airline Suspends Cargo Flights Bringing Medical Supplies To India

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात