विशेष प्रतिनिधी
बीजिंग – चीनने आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) क्षेत्रात आघाडी घेत या तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा न्यायाधीशाची निर्मिती केली आहे. दोन्ही बाजूंच्या वकिलांचे तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर तो ९७ टक्के योग्य निर्णय देऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे. China invented AI based Judge
‘शांघाय पुडाँग पीपल्स प्रोक्युरेटोरेट’ने या ‘एआय’वर आधारित ‘जज’ची निर्मिती केली आहे. या प्रोग्रॅमच्या वापरामुळे वकिलांवरील कामाचा ताण बऱ्याचप्रमाणात कमी होईल. काही प्रकरणामध्ये हा ‘एआय’ने सुसज्ज असणारा न्यायाधीश प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेमध्ये वकिलांची देखील जागा घेऊ शकतो. या सगळ्या प्रणालीचा डेस्कटॉप कॉम्प्युटरमध्ये एखाद्या प्रणालीसारखा वापर होऊ शकतो. हा जज संबंधित संगणकीय प्रणालीतील कोट्यवधी डेटाचा अभ्यास करून त्यातील तपशील पडताळून पाहू शकतो. जगातील हजारो खटल्यांचा आधार घेत या न्यायिक प्रणालीची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये साधारपणे २०१५ ते २०२० पर्यंतच्या खटल्यांचा समावेश होता.
अत्यंत वेगाने धोकादायक पद्धतीने गाडी चालविणारे चालक, क्रेडिट कार्डमधील गैरव्यवहार आणि चोरीसारख्या क्षुल्लक घटनांना ताबडतोब पकडण्याचे सामर्थ्य या प्रणालीमध्ये आहे. दरम्यान सरकारने या प्रोग्रॅमची निर्मिती केली असली तरीसुद्धा तेथील लोकांनी मात्र त्याला विरोध केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App