चीनचा दावा : 100 कोटी नागरिकांना लसीचे दोन्ही डोस दिले, लसीकरणातील नवा रेकॉर्ड!


चीनने कोरोना लसीकरणाच्या बाबतीत नवीन विक्रम प्रस्थापित केल्याचा दावा केला आहे. चीनने 100 कोटींहून अधिक लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस दिले आहेत. म्हणजेच, चीनमधील नागरिकांना 200 कोटींहून अधिक कोविड लसीचे डोस देण्यात आले आहेत. चीनचे सरकारी माध्यम शिन्हुआने ही माहिती दिली आहे. तथापि, नुकताच भारताने 21 ऑक्टोबर रोजी 100 कोटी लस देण्याचा विक्रम केला आहे.China claims that 100 crore citizens were given both doses of vaccine, a new record in vaccination


वृत्तसंस्था

बीजिंग : चीनने कोरोना लसीकरणाच्या बाबतीत नवीन विक्रम प्रस्थापित केल्याचा दावा केला आहे. चीनने 100 कोटींहून अधिक लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस दिले आहेत. म्हणजेच, चीनमधील नागरिकांना 200 कोटींहून अधिक कोविड लसीचे डोस देण्यात आले आहेत. चीनचे सरकारी माध्यम शिन्हुआने ही माहिती दिली आहे. तथापि, नुकताच भारताने 21 ऑक्टोबर रोजी 100 कोटी लस देण्याचा विक्रम केला आहे.

अधिकृत आकडेवारी जाहीर करताना, चीनने रविवारी सांगितले की त्यांनी 1.06 अब्ज लोकांना पूर्णपणे लसीकरण केले आहे. चीनने 224 कोटींपेक्षा जास्त लस डोस लागू केले आहेत. आतापर्यंत चीन कोरोना संसर्ग आणि लसीकरणाबद्दल फारच कमी माहिती देत ​​होता. दुसरीकडे, चीनमध्ये कोरेाना संसर्गात वाढ झाल्याच्याही बातम्या समोर आल्या आहेत, यामुळे चीनमध्ये कोरोना संपण्याची आशा धुसर होताना दिसत आहे.

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाचे प्रवक्ते मी फेंग यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, देशात 1.06 अब्ज लोकांना पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे. बीजिंगमध्ये स्टेट कौन्सिलच्या कोविड-19 रिस्पॉन्स टास्क फोर्सच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.

विशेष म्हणजे 21 ऑक्टोबर रोजी भारताने 100 कोटी लसीचे डोस देण्याचा विक्रम केला आहे. भारतात 16 जानेवारी 2021 पासून लसीकरण मोहीम सुरू झाली. तर चीन जुलै 2020 पासून लसीकरण मोहीम सुरू आहे. एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे की, भारत येत्या 3-4 महिन्यांत 100 कोटींहून अधिक डोस देऊ शकेल. जर हे लक्ष्य साध्य झाले तर भारत चीनपेक्षा कमी वेळेत 100 कोटी नागरिकांना कोरोनाचे दोन्ही डोस देऊ शकेल.

चीनमध्ये सिनोफॉर्मची सिनोफॉर्म आणि सिनोव्हॅक लस दिली जात आहे. सिनोफॉर्म आणि सिनोव्हॅक यांना डब्ल्यूएचओने आपत्कालीन वापरासाठीदेखील मान्यता दिली आहे. चीननेही हळूहळू कामाची ठिकाणे, सार्वजनिक ठिकाणे आणि लस नसलेल्या व्यावसायिक आस्थापनांवर बंदी घालण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाची वाढती प्रकरणे पुन्हा डोकेदुखी ठरू शकतात. चीनमधील आरोग्य कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की इतर देशांतील डेल्टा प्रकारातील रुग्णांद्वारे हा संसर्ग पुन्हा पसरला आहे.

डिसेंबर 2019 मध्ये कोरोना विषाणूचा प्रसार चीनच्या वुहानच्या मांस बाजारातून झाला होता. अल्पावधीतच जगभरात महामारी म्हणून हा रोग पसरला. या महामारीमुळे आतापर्यंत जगात 50 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

China claims that 100 crore citizens were given both doses of vaccine, a new record in vaccination

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    India’s Cheapest Electric Car Launched Tata Tiago EV From Just 8.49 Lakhs; वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती