विशेष प्रतिनिधी
बीजिंग – तालिबानशी सर्व घटकांनी संवाद साधावा आणि त्यांना मार्गदर्शन करावे असे आवाहन चीनने केले आहे. अमेरिकेबरोबरील परराष्ट्र मंत्री पातळीवरील चर्चेत ही भूमिका मांडण्यात आली. चीनने तालिबानला अधिकृत मान्यता देण्याची केवळ औपचारिकता पूर्ण केलेली नाही.China backs Taliban once again
या आवाहनाद्वारे तालिबानशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित करण्याचे स्पष्ट संकेत चीनने दिले. चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. त्यावेळी चीनकडून दूरगामी परिणाम साधणारे अनेक मुद्दे मांडण्यात आले.
चीनने म्हटले आहे की, अफगाणिस्तानमधील परिस्थितीत मूलभूत पातळीवर बदल झाला आहे. त्यामुळे सर्वांनी तालिबानशी संपर्क साधण्याची गरज निर्माण झाली आहे. अफगाणिस्तानात सैन्य पाठविण्याचा अमेरिका आणि नाटो देशांचा निर्णय सपशेल चुकल्याचा मुद्दाही वँग यांनी अधोरेखित केला.
ब्लिंकन यांना त्यांनी सांगितले की, दहशतवादी शक्तींचा बीमोड करण्याचा उद्देश अफगाणिस्तानातील युद्धामुळे कधीही साध्य झाला नाही हे वस्तुस्थितीवरून सिद्ध होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App