वृत्तसंस्था
टोकियो – जपानमधील अब्जाधीश आणि फॅशन क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तीमत्त्व युसाकू मेझावा आणि त्यांचे सहकारी योझो हिरानो यांनी कझाखस्तान येथील बैकानूर अवकाश केंद्रावरून रशियाच्या सोयूझ अवकाशयानातून आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकाकडे उड्डाण केले.Billionareate Yusaku Mezawa take off in space
हिरानो हे निर्माते आहेत. युसाकू यांना त्यांच्या अवकाशमोहिमेचे चित्रीकरण करायचे आहे. या दोघांबरोबर रशियाचे अवकाशवीर अलेक्झांडर मिसुर्किन हेदेखील यानामध्ये आहेत. युसाकून आणि हिरानो हे बारा दिवस आंतरराष्ट्रीय अवकाशकेंद्रात राहणार आहेत.
स्वत: पैसे खर्च करून या केंद्रात राहणारे २००९ नंतरचे ते पहिलेच अवकाश पर्यटक ठरणार आहेत. त्यांच्या या यशस्वी उड्डाणामुळे अवकाश पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ज्यांच्याकडे अफाट पैसा व धैर्य आहे त्यांच्यासाठी पर्यटनाचे अनोखे विश्व आता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून खुले होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App