वृत्तसंस्था
लंडन: दक्षिण आफ्रिकेत कोरोनाव्हायरसचा एक नवीन प्रकार आढळल्यानंतर जगभरात भीतीचे वातावरण आहे. देशातील विषाणूशास्त्रज्ञ तुलिओ डी ऑलिव्हेरा यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांना सांगितले की, दक्षिण आफ्रिकेत अनेक उत्परिवर्तनांसह कोविड प्रकार समोर आला आहे. BIG NEWS THIRD WAVE! Third wave of corona in France-Germany-England; Emergency in Portugal-Czech Republic; Emergency meeting of WHO
यानंतर, युनायटेड किंगडम ने 6 आफ्रिकन देशांमधील उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्याची घोषणा केली आहे . उड्डाणे रद्द झाल्याची माहिती यूकेचे आरोग्य सचिव साजिद जाविद यांनी दिली. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने तातडीची बैठक बोलावली आहे.
UPDATE: UK bans flights from South Africa, Botswana, Namibia, Zimbabwe, Lesotho and Eswatini due to new coronavirus variant — BNO News (@BNOFeed) November 25, 2021
UPDATE: UK bans flights from South Africa, Botswana, Namibia, Zimbabwe, Lesotho and Eswatini due to new coronavirus variant
— BNO News (@BNOFeed) November 25, 2021
फ्रान्स, दक्षिण आफ्रिका, जर्मनी, पोर्तूगाल, इंग्लंडमध्ये कोरोनाची तिसरी लाट धडकलीय. याच उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर काही देशांनी आणीबाणी जाहीर केलीय तर काहींनी शाळा, ऑफिसेस पुन्हा एकदा बंद केलीत.
आफ्रिकेतल्या सहा देशातून येणाऱ्या विमानांवरही बंदी घालण्यात आलीय. B.1.1.529 असं कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचं नाव असून तो अधिक घातक असल्याचे रिपोर्ट आहेत.
लसही अपयशी
विशेष म्हणजे हा नवा व्हेरिएंटनं त्या देशात धूमाकुळ घातलाय जिथं लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. म्हणजेच कोरोनाच्या व्हेरिएंटला रोखण्यात लस अपयशी ठरतेय.
यूरोप, आफ्रिका, अमेरीकेत स्फोट
कोरोनाच्या नव्या लाटेनं फ्रान्स, जर्मनी, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, पोर्तूगाल, झेक रिपब्लिक ह्या देशांना कवेत घ्यायला सुरुवात केलीय. फ्रान्समध्ये एका दिवसात 33 हजार 464 नवे रुग्ण सापडलेत. एप्रिलनंतर एवढे रुग्ण एकाच दिवसात सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर दक्षिण आफ्रिकेत 2 हजार 465 नवे रुग्ण आढळून आलेत.
गेल्या आठवड्याच्या तुलनेत हा आकडा 321 टक्क्यांनी अधिक आहे. जर्मनीत तर कोरोनानं हाहाकार माजवलाय. तिथं एका दिवसात 75 हजार 565 नवे कोरोना रुग्ण सापडलेत. हा आतापर्यंतचा रूग्ण सापडण्याचा सर्वात मोठा आकडा आहे. अमेरीकेतही कोरोनाचा उद्रेक झालाय.
1 लाख 17 हजार, 666 एवढे नवे रुग्ण सापडलेत. दीड हजारपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालाय. गेल्या 18 दिवसांपासून हा आकडा सातत्यानं वाढतो आहे. बेल्जियममध्ये कोरोनाचे 23 हजार 350 नवे रुग्ण सापडलेत. ऑक्टोबरनंतरचा हा सर्वात मोठा रुग्ण आकडा आहे. विशेष म्हणजे हे सर्व रुग्ण हे कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं बाधित आहेत.
आणिबाणी
झेक रिपब्लिकनं आणीबाणीची घोषणा केलीय तर पोर्तुगालनं नैसर्गिक आपत्ती जाहीर केलीय. त्या पार्श्वभूमीवर नवी बंधनं घालण्यात आलीयत. त्यात मास्क पुन्हा अनिवार्य करण्यात आलाय. ख्रिसमसच्यापुर्वी टेस्टिंग सांगण्यात आलीय तर काही जागांसाठी पास अनिवार्य केला गेलाय. विशेष म्हणजे पोर्तुगाल हा जगातल्या सर्वाधिक लसीकरण झालेल्या देशांपैकी एक आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App