फिलिपिन्समध्ये लष्कराचे विमान कोसळले, २९ सैनिक ठार


विशेष प्रतिनिधी

मनिला :फिलिपिन्स हवाई दलाचे ‘सी-१३०’ हे मालवाहू विमान धावपट्टीवर उतरताना कोसळून झालेल्या अपघातात २९ सैनिक ठार झाले. विमानाच्या अवशेषांमधून ५० जणांना बाहेर काढण्यात यश आले.
विमान कोसळण्यापूर्वी बचावासाठी अनेक सैनिकांनी त्यातून उड्या मारल्या, असे हा अपघात प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी सांगितले.army plane crashed in Philippines

सैन्याने प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांमध्ये विमानाच्या शेपटीकडील भाग दिसत आहे. नारळांच्या झाडांनी वेढलेल्या भागात पडलेल्या या विमानाचे अन्य अवशेष जळालेले व ठिकठिकाणी विखुरलले होते.
या विमानात ९२ प्रवासी होते.तीन वैमानिक आणि पाच कर्मचारी वगळता उर्वरित सैन्याततील कर्मचारी होते. दक्षिणेतील सुलू प्रांतातील डोंगराळ भागात वसलेल्या पाटीकुलमधील बंगकल येथे हा अपघात झाला. जोलो शहराच्या विमानतळावरील धावपट्टीवर विमान उतरू शकले नाही. वैमानिकाने पुन्हा नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला, पण विमानाचा अपघात होऊन त्याला आग लागली.

‘लॉकहिड सी-१३० हर्क्युलस या बनावटीची अमेरिकेच्या हवाई दलातील निवृत्त झालेली दोन विमाने अमेरिकेने फिलिपिन्सला यंदा सैन्य साहाय्य उपक्रमाअंतर्गत दिली होती. अपघातग्रस्त विमान त्यापैकी एक होते.

army plane crashed in Philippines

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय