Alaska to Australia : या पक्षाचा वर्ल्ड रेकॉर्ड! २३९ तास-एकही क्षण न थांबता – १३ हजार किलोमीटरचा प्रवास ; IFS ऑफिसरचे ट्विट


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : एका पक्षाचा वर्ल्ड रेकॉर्ड समोर आला आहे. या पक्षाने २३९ तासात १३ हजार किलोमीटर अंतर पार केलं आहे. विशेष बाब म्हणजे या पक्षानं इतकं मोठं अंतर न थांबता म्हणजेच ब्रेक न घेता पार केलं आहे.आयएफएस अधिकारी रमेश पांडे यांनी ही पोस्ट ट्विटरच्या माध्यमातून शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.Alaska to Australia: World record for this party

त्यांनी ट्विट करत सांगितलं, की एका Bar-tailed Godwit ने न थांबता आणि आराम न करता १३ हजार किलोमीटर प्रवास केला.

या पक्षाने अलास्का ते ऑस्ट्रेलिया असा प्रवास केला. आपल्या या जिद्दीसोबतच पक्षाने स्वतःच्या नावे रेकॉर्ड नोंदवला आहे, कारण याआधी इतक्या दूरपर्यंत न थांबता कोणत्याही पक्षाने प्रवास केलेला नाही. या पक्षाचे फोटो Geoff White/Adrien Riegen ने कॅप्चर केले आहेत.

या पक्षाची ही जिद्द आणि मेहनत पाहून सगळेच हैराण झाले आहेत. एका यूजरनं या पक्षाचं कौतुक करत लिहिलं, माहिती नव्हतं की पक्षी आराम न करता इतकं अंतर कापू शकतात आणि सलग उडू शकतात. याशिवाय इतरही अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत पक्षाचं कौतुक केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!