Afghanistan : अफगाणिस्तानमधील गंभीर सुरक्षा परिस्थिती पाहता भारताने मझार-ए-शरीफमधील वाणिज्य दूतावासातून आपले राजनयिक आणि कर्मचारी बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच सर्व भारतीय कर्मचाऱ्यांना अफगाणिस्तानचे चौथे मोठे शहर मजार ए शरीफ येथून सुखरूप भारतात आणले जात आहे. यासह अफगाणिस्तानमधील सर्व भारतीय नागरिकांसाठी अधिक कडक सुरक्षा इशारा जारी करण्यात आला आहे. after kandahar india is now removing its diplomats and staff from afghanistan
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अफगाणिस्तानमधील गंभीर सुरक्षा परिस्थिती पाहता भारताने मझार-ए-शरीफमधील वाणिज्य दूतावासातून आपले राजनयिक आणि कर्मचारी बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच सर्व भारतीय कर्मचाऱ्यांना अफगाणिस्तानचे चौथे मोठे शहर मजार ए शरीफ येथून सुखरूप भारतात आणले जात आहे. यासह अफगाणिस्तानमधील सर्व भारतीय नागरिकांसाठी अधिक कडक सुरक्षा इशारा जारी करण्यात आला आहे.
अफगाणिस्तानच्या बाल्ख आणि तखार प्रांतात तालिबानी लढाऊ आणि अफगाण सुरक्षा दलांमध्ये तीव्र संघर्षादरम्यान हा निर्णय घेण्यात आला आहे. तालिबानने उत्तर बल्खच्या अनेक भागांवर कब्जा केला आहे. मझार-ए-शरीफ बाल्ख प्रांताची राजधानी आणि अफगाणिस्तानमधील चौथे मोठे शहर आहे.
उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा परिस्थितीच्या आकलनाच्या आधारे, भारतीय कर्मचाऱ्यांना मजार शरीफमधून काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, काबूलमधील दूतावासातील कपातीबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
अफगाणिस्तानमध्ये सतत चिंताजनक होत जाणारी सुरक्षा आणि तालिबानचे हल्ले पाहता भारताने कंधारमधील वाणिज्य दूतावासातून आधीच आपले राजनयिक आणि कर्मचारी मागे घेतले आहेत. तसेच सुरक्षा मूल्यांकन पाहता, हेरात आणि जलालाबाद येथील वाणिज्य दूतावासातून आपले कर्मचारी परत आणल्यानंतर त्यांनी तेथे काम करणे तात्पुरते बंद केले आहे.
एवढेच नव्हे, तर अफगाणिस्तानमध्ये उपस्थित असलेल्या सर्व भारतीय नागरिकांसाठी अधिक कडक सुरक्षा निर्देशांसह सल्ला जारी केला जात आहे. सूत्रांनुसार, गैर-राजनैतिक कामात गुंतलेल्या सर्व भारतीय नागरिकांना लवकरात लवकर अफगाणिस्तान सोडण्यास सांगितले जात आहे.
दरम्यान, सरकारने असे सूचित केले आहे की जर अफगाणिस्तानातील अल्पसंख्याक हिंदू आणि शीख यांनाही सुरक्षिततेसाठी भारतात तात्पुरते यायचे असेल, तर त्यांना पूर्ण पाठिंबा दिला जाईल. तथापि, सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले की ,आतापर्यंत कोणत्याही विशेष निर्वासन ऑपरेशन किंवा फ्लाइटची कोणतीही योजना नाही. कारण अफगाणिस्तानमधील काबूल विमानतळावरून व्यावसायिक उड्डाणे सुरू आहेत.
अफगाणिस्तानमध्ये तालिबान आणि अफगाण सुरक्षा दलांमधील तीव्र लढाईत तालिबान लढाऊ मोठ्या प्रमाणावर कब्जा करत आहेत. हे पाहता भारताच्या चिंताही वाढल्या आहेत. तथापि, भारतीय रणनीतिकारांचा असा विश्वास आहे की, सध्याच्या परिस्थितीत तालिबानला संपूर्ण अफगाणिस्तान ताब्यात घेणे कठीण आहे. अशा स्थितीत त्यांना काबूल काबीज करायलाही वेळ लागेल. त्याच वेळी थेट सत्ता ताब्यात घेतल्याने तालिबानसाठीही अडचणी वाढतील.
तथापि, ही सर्व परिस्थिती पाहता हे निश्चित आहे की भारतापुढची राजकीय आव्हाने अफगाणिस्तानच्या डळमळीत स्थितीमुळे वाढली आहेत. यामध्ये, एकीकडे अफगाणिस्तानमध्ये केलेल्या धोरणात्मक गुंतवणुकीला धोका आहे, तर अफगाणिस्तानात होत असलेल्या दहशतवादाच्या उद्रेकाचा भारताच्या सीमेवरही परिणाम होऊ शकतो, हीसुद्धा भीती आहे.
after kandahar india is now removing its diplomats and staff from afghanistan
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App