आफ्रिकन देश काँगोमध्ये पूर-भूस्खलनांचे तांडव, 176 जणांचा मृत्यू, अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आफ्रिकन देश काँगोमध्ये 2 दिवस मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि महापूर आला आहे. आतापर्यंत 170 हून अधिक लोकांचा यात मृत्यू झाला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, दक्षिण किवू प्रांतातील कालेहे भागात 4 मे रोजी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने पूर आला होता. त्यामुळे बुशुशू आणि न्यामुकुबी गावात पाणी तुंबले.176 killed, many buried under debris as floods and landslides wreak havoc in African country Congo

न्यामुकुबी गावात राहणारे मुपेंदा म्हणाले – पुरामुळे संपूर्ण गावात नासधूस झाली. माझी आई, माझी 11 मुलेही वाहून गेली. ते वाचले नाहीत. दुसरी व्यक्ती म्हणाली – पूर आणि भूस्खलनामुळे आमचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. आम्ही सर्वजण ढिगाऱ्याखाली आपल्या प्रियजनांचा शोध घेत आहोत. लोकांना उघड्यावर झोपावे, जगावे लागत आहे.



मृतांचा आकडा वाढण्याची भीती

किवू प्रांताच्या गव्हर्नरनी सांगितले की, येथील अनेक घरे पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. शाळा, रुग्णालयेही पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. पिण्याचे पाणी आणि वीजपुरवठाही ठप्प झाला आहे. आतापर्यंत 176 जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा वाढू शकतो. 100 हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. मात्र, ढिगाऱ्याखालून 226 मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे.

मदत कार्यात अडथळे

अनेक भागांत बचावकार्य सुरू आहे. एका बचाव कर्मचाऱ्याने सांगितले- माती खूप ओली आहे आणि भाग निसरडा आहे त्यामुळे बचाव कार्यात अनेक अडचणी येत आहेत. अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. त्याचवेळी एका डॉक्टरने सांगितले की त्यांची टीम दोन दिवसांपासून न झोपता लोकांना मदत करत आहे. त्यांच्याकडे एका दिवसात 56 हून अधिक रुग्ण येत आहेत. यापैकी बहुतांश जणांना फ्रॅक्चर आहे.

176 killed, many buried under debris as floods and landslides wreak havoc in African country Congo

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात