‘’ज्या लोकांपासून आपण वर्षानुवर्षे आपल्या देशवासीयांचे रक्षण केले त्यांनाच आता सत्तेत स्थान दिले जात आहे.’’, असंही शेख हसीना म्हणाल्या.
विशेष प्रतिनिधी
ढाका:Sheikh Hasina बांगलादेशातील राजकीय गोंधळाच्या काळात, माजी पंतप्रधान आणि सत्ताधारी अवामी लीगच्या प्रमुख शेख हसीना यांनी अंतरिम सरकारचे प्रमुख आणि नोबेल पुरस्कार विजेते डॉ. मुहम्मद युनूस यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. शेख हसीना यांनी दावा केला की युनूसने आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांच्या मदतीने सत्ता काबीज केली होती आणि आता संपूर्ण देश त्याच दहशतवाद्यांच्या ताब्यात आहे.Sheikh Hasina
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, शेख हसीना यांनी फेसबुक पोस्टद्वारे आरोप केला आहे की, युनूसने सत्ता काबीज करण्यासाठी ज्या लोकांची मदत घेतली होती हे तेच कट्टरपंथीय आणि दहशतवादी आहेत, ज्यांच्यापासून बांगलादेशातील लोकांना आतापर्यंत संरक्षण देण्यात येत होते. युनुसने सत्ता काबीज करण्यासाठी बंदी घातलेल्या संघटनांच्या दहशतवाद्यांशी हातमिळवणी केली. ज्या लोकांपासून आपण वर्षानुवर्षे आपल्या देशवासीयांचे रक्षण केले त्यांनाच आता सत्तेत स्थान दिले जात आहे.”
शेख हसीना यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, “जेव्हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा आम्ही कठोर कारवाई केली. अनेक कट्टरपंथीयांना अटक करण्यात आली. पण आता ते सर्व तुरुंगातून सुटले आहेत. बांगलादेशचे तुरुंग जवळजवळ रिकामे झाले आहेत. युनूसने या दहशतवाद्यांना मुक्त केले आहे आणि आता बांगलादेश त्यांच्या नियंत्रणाखाली आहे. त्यांनी हे देशाच्या सार्वभौमत्वासाठी, सुरक्षिततेसाठी आणि लोकशाहीसाठी गंभीर धोका असल्याचे वर्णन केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App