Yunus government : युनूस सरकारने शेख हसीना विरुद्ध आणखी एक अटक वॉरंट केले जारी

Yunus government

आयसीटीने हसिनाविरुद्ध जारी केलेले हे दुसरे अटक वॉरंट आहे.


विशेष प्रतिनिधी

ढाका:Yunus government  बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाधिकरणाने (ICT) सोमवारी माजी पंतप्रधान शेख हसीना आणि अन्य 11 जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी केले. ज्यांच्या विरोधात आयसीटीने वॉरंट जारी केले आहे त्यात माजी लष्कर जनरल आणि माजी पोलीस प्रमुख यांचा समावेश आहे. जबरदस्तीने लोकांना गायब करण्याच्या घटनांमध्ये त्यांच्या कथित भूमिकेसाठी खटला भरण्यात आला आहे. आयसीटीने हसिनाविरुद्ध जारी केलेले हे दुसरे अटक वॉरंट आहे.Yunus government



गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सरकारविरोधी निदर्शने आणि अवामी लीगचे सरकार पडल्यानंतर हसिना यांनी भारतात आश्रय घेतला होता. ट्रिब्युनलने हसीनाविरुद्ध आतापर्यंत तीन गुन्हे दाखल केले आहेत. “ट्रिब्युनलचे अध्यक्ष न्यायमूर्ती मोहम्मद गुलाम मुर्तुजा मजुमदार यांनी फिर्यादीची याचिका ऐकल्यानंतर अटक वॉरंट जारी केले,” असे आयसीटी अधिकाऱ्याने सांगितले. पोलिस महानिरीक्षकांना हसिना यांच्यासह १२ जणांना अटक करून १२ फेब्रुवारी रोजी न्यायाधिकरणासमोर हजर करण्याचे आदेश देण्यात आले होते.

अलीकडेच बांगलादेशातील भ्रष्टाचारविरोधी समितीने रूपपूर अणुऊर्जा प्रकल्पात 5 अब्ज डॉलर्सच्या घोटाळ्याच्या आरोपासंदर्भात माजी पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध चौकशी सुरू केली आहे. बांगलादेशातील रूपपूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या बांधकामात भारतीय कंपन्या सहभागी आहेत. हे रशियन सरकारी कंपनी Rosatom द्वारे बांधले जात आहे. बांगलादेशची राजधानी ढाकापासून पश्चिमेला १६० किलोमीटर अंतरावर रूपपूर येथे रशियाने डिझाइन केलेला पहिला बांगलादेशी अणुऊर्जा प्रकल्प उभारला जात आहे.

Yunus government issues another arrest warrant against Sheikh Hasina

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात